
सावंतवाडी : राजा शिवाजी चौक, गवळी तिठा येथील विद्युत पोलवरील लटकणारा लोखंडी रॉड तुटून पडल्यास दुर्घटना होण्याची शक्यता असल्याचे सामाजिक बांधिलकीचे रवी जाधव यांनी निदर्शनास आणून दिले आहे. मेन लाईन असलेल्या पोलावर मोठा लोखंडी रॉड तुटून लटकत आहे. या ठिकाणी कुडाळ व आंबोली येथे जाणाऱ्या वाहनांची व नागरिकांची गर्दी असते. अशावेळी तो रॉड तुटून पडल्यास दुर्घटना होण्याची शक्यता नाकारता येत नाही.
त्याअगोदर महावितरणने त्यावर तत्काळ कारवाई करून तो रॉड तत्काळ हटवावा अशी मागणी सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे रवी जाधव यांनी केली आहे.