नाटळ ग्रामपंचायतला कायमस्वरूपी ग्रामसेवकांची मागणी..!

Edited by:
Published on: January 23, 2024 11:32 AM
views 332  views

कणकवली :  नाटळ ग्रामपंचायतला कायमस्वरूपी ग्रामसेवक मिळावा यासाठी गटविकास अधिकारी कणकवली यांना निवेदन देण्यात आले. गेली चार वर्षे नाटळ ग्रामपंचायततिला कायमस्वरूपी ग्रामसेवक नसल्याने गावच्या विकासाची कामे होत नाहीत, ग्रामस्थांची कामे होत नाही आणि जर कायमस्वरूपी ग्रामसेवक नाही मिळाला तर आंदोलन करण्यात येईल अशा प्रकारचं निवेदन देण्यात आलं.

यावेळी ग्रामपंचायत सदस्य पद्माकर पांगम, रमा घाडीगांवकर, आणि ग्रामस्थ प्रदीप सावंत, अभिषण सावंत, नलेश परब, संजय सावंत, राजेश गावकर, सुर्यकांत सरंगले, गणेश सावंत, सचिन खांदारे  आदि उपस्थित होते.