'आय लव कुडाळ' च्या ठिकाणी 'माझे कुडाळ' करण्याची मागणी

Edited by:
Published on: December 11, 2023 19:48 PM
views 131  views

कुडाळ : कुडाळ नगरपंचायत सेल्फी पॉईंट येथील इंग्रजी मधील "आय लव कुडाळ" नावाच्या ठिकाणी मराठीत "माझे कुडाळ" असा बदल करावा अशी मागणी उबाठा गटाचे कुडाळ नगरपंचायत नगरसेवक मंदार शिरसाट यांनी नगराध्यक्ष कुडाळ यांच्याकडे निवेदनाद्वारे केली आहे.

नगरसेवक मंदार शिरसाट यांनी दिलेल्या निवेदनात असे म्हटले आहे की, शासनाने प्रशासकीय भाषेसाठी मराठी भाषेचा वापर करणे अनिवार्य केले आहे. नगरपंचायतीने शासनाच्या मध्यवर्ती ठिकाणी कुडाळ बस स्थानक लगत मुख्य रस्त्यावर सेल्फी पॉइंट ची उभारणी केलेली आहे. या ठिकाणी आय लव कुडाळ असा उल्लेख इंग्रजी भाषेत आहे. शासन निर्णयानुसार इंग्रजी उल्लेख बदलून "माझे कुडाळ" असा उल्लेख होणे आवश्यक आहे तरी असा बदल करण्याबाबत नगरपंचायत समितीवर  विषय मान्यतेसाठी सादर करावा व तशा आशयाचा ठराव मंजूर करावा अशी विनंती नगरसेवक मंदार शिरसाट यांनी निवेदनाद्वारे  कुडाळ नगरपंचायत नगराध्यक्ष यांच्याकडे केली आहे.