आंबोलीबाबतच्या 'त्या' चुकीच्या बातमीची चौकशीची मागणी

Edited by:
Published on: June 15, 2023 11:12 AM
views 113  views

सावंतवाडी : आंबोली हे दक्षिण कोकणाचे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. या ठिकाणी येणाऱ्या पर्यटकांची वर्दळ वाढत असल्याने कोणीतरी आंबोली बाबत चुकीचा मजकूर सोशल मीडियावर प्रसिद्ध केला असल्याने आंबोली ची बदनामी होत आहे, ती टाळण्यासाठी सायबर क्राइम द्वारे चौकशी करून कारवाई करण्याची महाविकास आघाडीच्या पदाधिकारी यांनी नायब तहसीलदार मनोज मुसळे व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांच्याकडे केली.

ठाकरे शिवसेना, काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी तहसीलदार कार्यालयात नायब तहसीलदार मनोज मुसळे व पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे यांना भेटून निवेदन दिले.आंबोली ची बदनामी होत आहे ती थांबली पाहिजे म्हणून पावले उचलली पाहिजेत अशी मागणी केली.

यावेळी रुपेश राऊळ म्हणाले, आंबोली हे थंड हवेचे ठिकाण म्हणून प्रसिद्ध आहे. मात्र आंबोली घाटातील काही प्रकार बाबत आंबोली पर्यटन स्थळ बदनाम करण्याचा कोणी तरी घाट घातला आहे. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेल्या माहितीवर गोवा मधील काही असल्याची चर्चा आहे. याला वेळी आळा घालण्यासाठी पोलिसांनी पुढाकार घेतला पाहिजे.पोलीस निरीक्षक फुलचंद मेंगडे म्हणाले, आंबोली ग्रामपंचायत पर्यटन बैठकीत चर्चा झाली. सोशल मीडियावर प्रसिद्ध झालेला मजकूर खोटा आहे तसा प्रकार घडला नाही. त्यामुळे सोशल मीडिया शोध घेतला जात आहे.माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले व अमित सामंत म्हणाले, या साऱ्या प्रकारामुळे आंबोली पर्यटनावर परिणाम होणार नाही म्हणून खबरदारी घेतली पाहिजे. सायबर क्राइम द्वारे चौकशी करून कारवाई करण्याची मागणी केली.आंबोली येथील पर्यटन स्थळ कोणीतरी बदनाम करून पर्यटनाला नजर लावण्याचा प्रयत्न करत असेल तर पोलीस आणि प्रशासनाने चौकशी करून खबरदारी घेतली पाहिजे असे यावेळी उपस्थितांनी सुचवले

यावेळी माजी राज्यमंत्री प्रवीण भोसले, काँग्रेस नेते विकास सावंत, ठाकरे शिवसेना तालुकाप्रमुख रूपेश राऊळ, राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष अमित सामंत, ठाकरे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय पडते, पुंडलिक दळवी, बाळा गावडे, चंद्रकांत कासार, जान्हवी सावंत, मायकल डिसोजा, अँड , दिलीप नार्वेकर व पदाधिकारी उपस्थित होते.