
सावंतवाडी : उभाबाजार सावंतवाडी सुवर्णकार पेठ येथे रात्रीच्या वेळी दोन वाजता एक अनोळखी व्यक्ती फिरत असल्याने येथे नेमलेल्या गुरख्यान त्याची विचारपूस केली. यावेळी आपण बेळगाव गावातील आहे असं त्या इसमाने सांगितलं. त्यामुळे पोलिसांनी सतर्क राहून ज्वेलरीपेठेमध्ये गस्त वाढवावी असे आवाहन जीवनरक्षा प्रतिष्ठानचे अध्यक्ष तथा सुवर्णकार राजेंद्र मसुरकर यांनी केले आहे.