
दोडामार्ग : दोडामार्ग तहसील कार्यालयातील शौचालय तत्काळ दुरुस्त करून नागरिकांच्या सेवेत द्या अन्यथा उपोषण करू असा इशारा सरपंच सेवा संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रवीण गवस यांनी दिला आहे. येथील नायब तहसीलदार यांना त्यांनी आज सोमवारी निवेदन दिले. यावेळी त्यांच्या सोबर कुडासे सरपंच पूजा देसाई, झोळंबे सरपंच विशाखा नाईक, कोणालकट्टा सरपंच पराषर सावंत, पाटये सरपंच प्रवीण गवस, शिरंगे सदस्य प्रशांत गवस आदी उपस्थित होते.
यावेळी नायब तहसीलदार यांच्याशी चर्चा करताना प्रवीण गवस म्हणाले की तालुक्याचे मुख्यालंय असल्यामुळे दिवसा शेकडो नागरिक येजा करत असतात, विशेष म्हणजे महिला याठीकाणी आपल्या कामासाठी येत असतात व या येणाऱ्या नागरिकांना इमारती मध्ये कुठेच शौचालय नाही आहे. त्यामुळे येणाऱ्या नागरिकांना मोठा त्रास सोसावा लागतो, तसेच कार्यालयात काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना देखील याचा त्रास सहन करावा लागत आहे. त्यामुळे याची तात्काळ दखल घेऊन नादुरुस्त आलेले शौचालय तात्काळ दुरुस्त करून नागरिकांच्या सेवेत आणून द्या अन्यथा उपोषणाचा इशारा त्यांनी दिला आहे.