विद्यार्थ्यांना शाळेसाठी लागणारे दाखले त्वरित वितरित करण्याची मागणी

Edited by: उमेश बुचडे
Published on: June 15, 2023 10:56 AM
views 183  views

कणकवली : सध्या मुलांचे ॲडमिशन सुरू आहेत आणि त्या ऍडमिशन घेणाऱ्या मुलांना उत्पन्न दाखले, नॉन क्रिमिलीअर, वय, अधिवास, जातीचे दाखले तसेच अन्य दाखल्यांची मागणी शाला प्रशासनाकडून करण्यात येते हे दाखले विद्यार्थ्यांना लवकरात लवकर मिळावेत यासाठी शिवसेना शिष्टमंडळाने  प्रांताधिकारी जगदिश कातकर यांची भेट घेतली.

यावेळी कणकवली सर्व प्रकारचे दाखले आता 'फिफो' सिस्टीमच्या माध्यमातून प्रथम दाखल प्रथम प्राधान्य या तत्वानुसारच होत आहेत. त्यातच गेल्या तीन दिवसांपासून सर्व्हेरला असलेल्या समस्येमुळे दाखले पुर्ण होऊ शकलेले नाहीत. मात्र, आता सर्व्हर चालू असून दोन दिवसांत प्रलंबीत दाखले पुर्ण होतील, असे प्रांताधिकारी जगदिश कातकर यांनी सांगितले.

फिफोच्या माध्यमातून दाखले वितरणास विलंब होत असेल तर ही पद्धत दोन महिने स्थगित ठेवण्याची मागणी करणार असल्याचे शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे म्हणाले.

प्रांताधिकारी पातळीवर अनेक दाखल प्रलंबीत आहेत. त्यामुळे सद्यस्थितीत प्रवेशासाठीच्या मुलांची गैरसाय होत असल्याच्या पार्श्वभूमीवर शिवसेना जिल्हाप्रमुख संजय आग्रे, संदेश पडते, भूषण परूळेकर यांनी प्रांताधिकारी श्री. कातकर यांची भेट घेऊन चर्चा केली.

यावेळी श्री. कातकर म्हणाले, पुर्वी सर्व दाखले स्क्रिनवर दिसायचे. आता नविन फिफो सिस्टीममुळे दहाच दाखले दिसतात. तसेच यातील दाखला मंजूर अथवा नामंजूर होईपर्यंत नविन दाखला दिसत नाही. तसेच गेल्या तीन दिवसांपासून सर्व्हरला असलेल्या समस्येमुळे दाखले प्रलंबीत आहेत. याबाबत आपण महाआयटीकडे तक्रारही केली आहे. आता साईड सुरू झालेली असून पुढील दोन दिवसांत दाखले देण्याची कार्यवाही पुर्ण होईल. आपल्याकडे १५० ते २०० दाखले प्रलंबीत आहेत. मात्र, ते पुर्ण करण्यास वेळ लागणार नाही. परंतु, त्यासाठी साईड चालू असणे आवश्यक आहे, असे सांगितलें.

या सिस्टीमधून अडचणी असतील तर ऑफलाईन दाखले देता येतील का? अशी विचारणाही करण्यात आली. मात्र, ऑफलाइन देण्याची गरज वाटत नाही. सद्यस्थितीत साईड सुरू असून प्रलंबीत दाखले दोन दिवसांत झाल्यानंतर सिस्टीममध्ये येणारे दाखले नियमित पुर्ण होतील, असेही श्री. कातकर यांनी सांगितले.