
देवगड : देवगड तालुक्यातील देवगड - निपाणी महामार्गावरिल देवगड - नांदगाव मुख्य मार्गावर देवगड, जामसंडे, तळेबाजार बाजारपेठ येथे रस्त्यावर मोकाट गुरांचा वावर दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणावर वाढू लागल्यामुळे गुरांमुळे होणाऱ्या अपघातांच्या प्रमाणात देखील मोठ्या प्रमाणात वाढ झाली आहे. यामुळे स्थानिक नागरिक, वाहन चालक यांमधून तीव्र नाराजी व्यक्त केली जात आहे. या मोकाट गुरांचा योग्य तो बंदोबस्त करावा अन्यथा आमरण उपोषण करण्याचा इशारा यावेळी सामाजिक कार्यकर्ते संतोष वरेरकर यांनी दिला आहे.
तसेच देवगड - नांदगाव रस्त्यावर टेंबवली एसटी बस स्टॉप ते शिरगाव चंदन बार (MSEB, तळेबाजार बाजारपेठ,चांदोशी फाटा, मिराशी हॉल, माऊली पेट्रोल पंप,लिंगडाळतिठा, आरेफाटा, वळीवंडे, तोरसोळे फाटा, शिरगाव चंदन बार) या परिसरात दिवसा-रात्री रस्त्यावरती गुरे उभी असतात. त्यामुळे वाहनचालकांचे अपघात होऊन बळी गेलेलेआहेत.याबाबत गुरे मालक अध्याप दखल घेत नाहीत. त्यामुळे गुरे मालकांना सबंधित प्रशासनाकडून योग्य ती समज देण्यात यावी तसेच या गुरांचा योग्य तो बंदोबस्त करून गुरे मालकांवर देखील योग्य ती कारवाई करण्यात यावी. कारवाई न केल्यास मी आपल्या विरोधात सार्वजिक बांधकाम विभाग देवगड येथे आमरण उपोषणास बसणार असल्या बाबतच्या आशयाचे निवेदन यावेळी संबंधित विभागांना सामाजिक कार्यकर्ते संतोष वरेरकर यांच्या कडून देण्यात आले आहे.