
सिंधुदुर्ग : भाजपच्या शिष्टमंडळाची रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघात भाजपचाच उमेदवार देण्याची वरिष्ठांकडे मागणी. शिष्टमंडळाने चंद्रशेखर बावनकुळे आणि देवेंद्र फडणवीस यांची भेट घेऊन कमळ चिन्हाचाच उमेदवार देण्याची केली मागणी.शिष्टमंडळात माजी आमदार प्रमोद जठार, माजी आमदार राजन तेली,प्रदेश उपाध्यक्ष अतुल काळसेकर,सिंधुदुर्ग भाजप अध्यक्ष प्रभाकर सावंत यांचा सहभाग.रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा उमेदवारीचा तिढा अजून कायम. शिवसेना(शिंदे) व भाजप कडून केली जातेय दावेदारी. भाजपच्या शिष्टमंडळाने भाजप पक्षाचाच उमेदवार द्यावा अशी ज्येष्ठांकडे मागणी केलीय.