
सावंतवाडी : दशावतार कलेवर प्रेम करणारी लोकं या ठिकाणी आहेत. सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार या महोत्सवास उपस्थित राहीले ही आनंदाची गोष्ट आहे. राजघराण्यांन कलाकार व कलावंतांना नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे उद्गार युवराजांनी काढले. तसेच गंजिफा कलेचं कलादालन या ठिकाणी उभारणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील कलावंतासाठी व प्रशिक्षणासाठी कलादालनाची मागणी त्यांनी यावेळी मंत्र्यांकडे केली. लोकोत्सव शुभारंभ प्रसंगी लखमराजे भोंसले बोलत होते.
सावंतवाडी राजघराण व श्री पंचम खेमराज महाविद्यालयाच्या लोककला विभागातर्फे २६ जानेवारी पर्यंत लोककला दशावतार महोत्सव २०२५ आयोजित करण्यात आला आहे. याचा शुभारंभ सांस्कृतिक मंत्री अॅड. आशिष शेलार यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी व्यासपीठावर भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, युवराज लखमराजे भोंसले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले, जिल्हा बँक उपाध्यक्ष अतुल काळसेकर, माजी नगरसेवक मनोज नाईक, अजय गोंदावळे, राजू राऊळ, अँड. शामराव सावंत, डॉ. सतिश सावंत, प्राचार्य दिलीप भारमल, भाई कलिंगण, शरद मोचेमाडकर, जयप्रकाश सावंत आदी उपस्थित होते. यावेळी युवराज लखमराजे भोंसले म्हणाले, दोन वर्ष आम्ही लोककला महोत्सव घेत असून हे तिसरं वर्ष आहे. दरवर्षी लोकांचा मोठा प्रतिसाद मिळतो. दशावतार कलेवर प्रेम करणारी लोकं या ठिकाणी आहेत. सांस्कृतिक मंत्री अँड. आशिष शेलार या महोत्सवास उपस्थित राहीले ही आनंदाची गोष्ट आहे. राजघराण्यांन नेहमीच कलाकार व कलावंतांना नेहमीच प्रोत्साहन दिल्याचे उद्गार युवराज लखमराजे यांनी काढले. तसेच गंजिफा कलेचं कलादालन या ठिकाणी उभारणार असल्याचे सांगत जिल्ह्यातील कलावंतासाठी व प्रशिक्षणासाठी कलादालनाची मागणी त्यांनी मंत्र्यांकडे केली. सिंधुदुर्ग जिल्ह्यात कलावंतांना प्रोत्साहन मिळाव, विविध कलांचं शिक्षण इथे मिळावं यासाठी त्यांनी सांस्कृतिक मंत्र्यांचे लक्ष वेधलं असता मंत्री शेलार यांनी सकारात्मक प्रतिसाद दिला.