
सावंतवाडी : रत्नागिरी-सिंधुदुर्गचा खासदार हा महायुतीचाच असणार, चिन्ह महायुतीचं असेल असा विश्वास भाजप नेते, अँड. आशिष शेलार यांनी व्यक्त केला. तर खासदार विनायक राऊत हे विकास करण्यात सपशेल अपयशी ठरले. त्यांचा पराभव निश्चित आहे. इथला खासदार हा मोदींना पाठिंबा देणारा असेल. विनायक राऊतांनी केवळ भाजपवर टीका करून बातम्या छापून आणल्या अशी खोचक टीका अँड. शेलार यांनी केली.
ते म्हणाले, महायुतीची उमेदवार हा नरेंद्र मोदी यांचा समर्थक असेल. पंतप्रधान नरेंद्र मोदी हेच उमेदवार आहेत असं समजून आम्ही कामाला लागलो आहेत. चार दिवसांत महायुतीचा उमेदवार जाहीर होईल. हा मतदारसंघ भाजपला मिळावा व नारायण राणे उमेदवार असावेत अशी मागणी कार्यकर्त्यांनी केली आहे. राणे हे केंद्रीय मंत्री व मोदींच्या मंत्रिमंडळात असल्यानं त्यांची मागणी होत आहे. महायुतीचे कार्यकर्ते कामाला लागले आहेत. महायुती एकत्र आहे, एकत्र राहील. मोदींना पाठिंबा देणारा खासदार इथून विजयी होईल असा विश्वास व्यक्त करत विनायक राऊत यांचा पराभव निश्चित आहे असा दावा अँड. शेलार यांनी केला.
तर भाजपला मोदी परिवार वाढवायचं आहे, तो वाढत आहे. या परिवारात येईल त्याला सामील करून घेतलं जाईल. दरम्यान, जो चोरी करतो त्यांच्यामागे ईडी लागते ती लागली पाहिजे. इडी मागे लागली की राजकीय हेतूने लागली असं सांगितलं जात. आपण निर्दोष आहे असं कुणीही सांगत नाही. इडी मोदी सरकारनं सुरु केलेली नाही असं ते म्हणाले. तर चार पक्ष लढतात त्यावेळी कोणता पक्ष निवडून येऊ शकतो ? कोणत उमेदवार येऊ शकतो यावर चर्चा होते. आमचात चर्चा आहे विसंवाद नाही. यामागे रणनिती देखील असते त्यामुळे उमेदवार योग्यवेळी जाहीर होईल. विनायक राऊत यांचा पराभव अडीच लाखान कोण करेल व पावणेतीन लाखान कोण ? यावर चर्चा सुरू आहे. देशात सगळ्या अहंकारी नेता उद्धव ठाकरे आहेत. त्यांच कधी चुकत नाही ते म्हणातत तेच खरं असं त्यांचं आहे. त्यामुळे त्यांनी आम्हाला शिकवायच्या भानगडीत पडू नये असा टोला ठाकरेंना हाणला. आम्ही अहंकारात जगत नाही. अतिआत्मविश्वासात आम्ही राहत नाही असा टोला लगावला.
दरम्यान, कोकणवासीयांची इच्छा असेल मोदी-शहा कोकणात यावेत तर भाजप त्यांना नाराज करणार नाही. राजन तेली यांची भावना ही नाराजीची नाही. तो प्रामाणिकतेचा सुर आहे. कार्यकर्त्यांला त्रास झाल्यास नेत्याला त्रास होत असेल तर ती चांगलीच गोष्ट आहे. नाथ पै, मधू दंडवते, सुरेश प्रभू यांच्याप्रमाणेच विकासात्मक काम कोकणात होत आहे. मात्र, विनायक राऊत यात सपशेल अपयशी ठरलेत. रत्नागिरी-सिंधुदुर्गच्या विकासासाठी सत्तेत असताना मतदारसंघात विकास करू शकले नाही. त्यांनी केवळ भाजपवर टीका करून बातम्या छापून आणल्या. त्यांना १०० पैकी गुण द्यायचे झाल्यास शुन्य गुण द्यावे लागलीत. त्यांचा पराभव निश्चित आहे. तर इथला उमेदवार हा महायुतीचा व चिन्ह देखील महायुतीचच असेल असं अँड. शेलार यांनी सांगितले. याप्रसंगी भाजपचे जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, महेश सारंग, संजू परब, रवींद्र मडगावकर, अजय गोंदावळे, केतन आजगावकर, दिलीप भालेकर, संतोष गावस, विनोद सावंत, अमित परब आदी उपस्थित होते.