सावंतवाडी इथं मोती तलाव काठावर दीपोत्सव उत्साहात !

रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब यांचं संयुक्त आयोजन
Edited by: विनायक गांवस
Published on: October 27, 2022 13:59 PM
views 176  views

सावंतवाडी : मोती तलाव काठावर रोटरी क्लब ऑफ सावंतवाडी आणि इनरव्हील क्लब यांचा संयुक्त विद्यमाने दरवर्षी प्रमाणे दीपोत्सव यंदा देखील मोठ्या दिमाखात साजरा करण्यात आला. माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर यांची यावेळी प्रमुख उपस्थिती होती. मोती तलाव काठावर लावलेल्या दिव्यांच्या प्रकशात परिसर प्रकाशमान झाला.‌ हे नयनरम्य दृश्य अनेकांनी मोबाईलमध्ये कैद केले. यावेळी फटाक्यांची मनोहारी आतषबाजी देखील करण्यात आली. 


यावेळी रोटरी अध्यक्षा विनया बाड, इनरव्हील अध्यक्षा दर्शना रासम, रोटरीचे सुहास सतोसकर, अनंत उचगवकर, साईप्रसाद हवालदार, जिगजींनी, इनरव्हीलच्या सुहासिनी तलेगवकर, शीतल केसरकर, देवता हावळ, सोनाली खोर्जुवेकर, रोट्रॅक्टचे मिहीर मठकर, पृथ्वीराज चव्हाण,  अराबेकर आदी रोटरी, इनरव्हील्सचे सर्व पदाधिकारी उपस्थित होते.