
कणकवली : परमहंस भालचंद्र महाराज संस्थान आयोजित व गंधर्व फाउंडेशन प्रस्तुत 'दीपावली प्रभात' ही शास्त्रोक्त गायन व अभंग - नाट्यपदांची मैफल सोमवार, २० ऑक्टोबर रोजी सकाळी ७.३० ते ९.३० या वेळेत होणार आहे. परमहंस भालचंद्र महाराज संस्थानमध्ये होणाऱ्या या मैफलीत पं. डॉ. समीर दुबळे यांचे शिष्य मनोज भालचंद्र मेस्त्री हे गायन सादर करणार आहेत. त्यांना संवादिनीवर संदीप पेंडुरकर, तबला नीरज भोसले, पखवाज सतीश गावडे, तालवाद्य नागेश तेली साथ करणार आहेत. शाम सावंत हे निवेदनाची जबाबदारी सांभाळणार आहेत. रसिकांनी लाभ घ्यावा, असे आवाहन करण्यात आले आहे.