
सावंतवाडी : सावंतवाडी शहराला स्वच्छ व सुंदर ठेवण्यासाठी योगदान देणारे आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते विशेष सत्कार करण्यात आला. त्यांच्या सेवाभावी कार्याचं कौतुक मंत्री राणेंनी यावेळी केल.
विश्व हिंदू परिषद बजरंगदल सावंतवाडी, शिवप्रेमी व गोरक्षक सिंधुदुर्गच्या वतीनं शिवजन्मोत्सवाच आयोजन सावंतवाडी येथे करण्यात आलं आहे. गांधी चौक येथे हा कार्यक्रम पार पडला. या कार्यक्रमाचे औचित्य साधून नगरपरिषदेचे आरोग्य कर्मचारी दीपक म्हापसेकर यांचा पालकमंत्री नितेश राणे यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. त्यांच्या सेवाभावी कार्याची दखल घेऊन शिवजयंती निमित्त हा विशेष सन्मान करण्यात आला.
यावेळी व्यासपीठावर पालकमंत्री नितेश राणे, माजी मंत्री आ.दीपक केसरकर, विवेक कुलकर्णी, विनायक रांगणेकर, अजित फाटक, चिन्मय रानडे, कृष्णा धुळपणवर, दिनेश गावडे आदी उपस्थित होते.










