दीपक म्हालटकर यांची नागपूरात तदर्थ जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती

Edited by: देवयानी वरसकर
Published on: March 20, 2024 09:53 AM
views 285  views

सिंधुदुर्ग : सावंतवाडीचे सुपुत्र दीपक म्हालटकर यांची नागपूर येथे तदर्थ जिल्हा न्यायाधीश म्हणून नियुक्ती झाली आहे. ते सध्या नागपूर येथेच  सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदिंडाधिकारी म्हणून कार्यरत होते. 

सावंतवाडी तालुक्यातील माडखोल गावचे रहिवासी दीपक बाबली म्हालटकर हे  सिंधुदुर्गातील न्यायालयांमध्ये वकिली व्यवसाय करत होते. सन 2008 मध्ये ते दिवाणी न्यायाधीश कनिष्ठ स्तर व न्यायदंडाधिकारी एक म्हणून न्यायिक सेवेत रुजू झाले. त्यानंतर त्यांना पदोन्नतीने दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व मुख्य  न्याय दंडाधिकारी म्हणून पदोन्नती मिळाली होती.

यापूर्वी त्यांनी सांगली, वर्धा, पुणे लातूर ,कोल्हापूर  व नागपूर येथे न्यायाधीश म्हणून काम केलेले होते. आज त्यांना तदर्थ जिल्हा न्यायाधीश म्हणून पदोन्नती मिळाली आहे. कोकणातील या पदापर्यंत जाणारे ठराविकच न्यायाधीश आहेत. अलीकडेच ते सिंधुदुर्ग जिल्हा विधी सेवा प्राधिकरण येथे सचिव म्हणून कार्यरत होते.

     गेल्या वर्षी त्यांची बदली नागपूर जिल्हा न्यायालयात मे.  सह दिवाणी न्यायाधीश वरिष्ठ स्तर व अतिरिक्त मुख्य न्यायदिंडाधिकारी म्हणून बदली झाली होती. आता त्यांना नागपूर येथेच सातवे तदर्थ जिल्हा न्यायाधीश म्हणून नामदार उच्च न्यायालय मुंबई यांनी पदोन्नती दिली आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील नामांकित वकील बापू गव्हाणकर  यांचे जूनियर म्हणून त्यांनी वकिली व्यवसाय सुरू केला होता. त्यांचे सर्व स्तरातून अभिनंदन होत आहे.