कुडासेतील आपतग्रस्त कुटुंबाला दीपक केसरकरांच्या शिवसेनेची मदत...!

Edited by: संदीप देसाई
Published on: July 25, 2023 19:02 PM
views 129  views

दोडामार्ग : अतिवृष्टीने राहते घर जमीनदोस्त होऊन संकटात सापडलेल्या कुडासे येथील वरक कुटुंबाला शिवसेनेने मदतीचा हात दिला आहे. कुडासे येथील ठकी बमू वरक व भगवान वरक यांचे राहते घर जमीनदोस्त झाले होते. त्या कुटुंबाला मंत्री दीपक केसरकर यांच्या मार्फत रोख स्वरूपात मदत करण्यात आली. ही मदत भगवान वरक यांच्याकडे दोडामार्ग शिवसेना तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस, जिल्हा समन्वयक शैलेश दळवी, उपतालुका दादा देसाई, युवा तालुका प्रमुख भगवान गवस, विभाग प्रमुख रामदास मेस्त्री, दोडामार्ग शहर प्रमुख योगेश महाले, महिला तालुका प्रमुख चेतना गडेकर, विभाग प्रमुख सान्वी गवस, कृष्णा गवस युवा विभाग प्रमुख मणेरी, प्रांजल गवस, उल्हास रेडकर, संदीप गवस, उपतालुका प्रमुख तिलकांचन गवस व कार्यालय प्रमुख गुरूदास सावंत यांच्या उपस्थीतीत सुपूर्त करण्यात आली.