दीपक केसरकर मित्रमंडळाकडून तळवडेतील नुकसानग्रस्त कुटूंबाला मदतीचा हात !

Edited by: विनायक गावस
Published on: July 28, 2023 19:40 PM
views 80  views

सावंतवाडी : तळवडे म्हाळईवाडी येथे झालेल्या जोरदार पावसामुळे गुरुनाथ चंद्रकांत नागवेकर यांच्या घरावरील छप्पर उडून जाऊन नुकसान झाले होते. त्याप्रसंगी त्याकुटूंबाला शालेय शिक्षणमंत्री दिपक केसरकर मित्रमंडळाकडून रोख स्वरूपात मदत करण्यात आली. ही मदत गुरुनाथ नागवेकर यांचकडे स्व. प्रकाश परब याचे चिरंजीव सुरज परब, राजन रेडकर, महेश परब,गेरव मेस्त्री ग्रामपंचायत सदस्य विनोद वराडकर, दिवाकर गावडे यांच्या उपस्तित सुपूर्द करण्यात आली.