दीपक केसरकरांचा झंझावाती प्रचार ; दोन 'संघटक' साथीला !

Edited by:
Published on: November 08, 2024 14:06 PM
views 352  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी गुरुवारी आपल्या प्रचाराचा नारळ फोडला. पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आम‌ नितेश राणेंच्या उपस्थितीत त्यांनी प्रचार यंत्रणेचा शुभारंभ केला.‌

श्री देव पाटेकर चरणी  पालकमंत्री रविंद्र चव्हाण, आमदार नितेश राणे, युवराज लखमराजेंच्या उपस्थित महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी नतमस्तक होत प्रचार यंत्रणेचा शुभारंभ केला. शुभारंभानंतर लागलीच महायुतीची बैठक घेतली. तब्बल साडेचार तास ही गोपनीय बैठक पार पडली. यानंतर सावंतवाडी, तळवडे, वेंगुर्ला, बांदा आदींसह ग्रामीण व शहरी भागात झंझावाती दौरा दीपक केसरकर यांनी सहकाऱ्यांसह केला. यावेळी भाजपचे जिल्हा संघटक महेश सारंग व शिवसेनेचे जिल्हा संघटक संजू परब केसरकरांसोबत प्रचार यंत्रणेत पहायला मिळाले. रात्री उशिरापर्यंत हे दोन्ही संघटक प्रचारात सक्रीय होते. या दोन्ही नेत्यांची ताकद ग्रामीण भागात असून त्यांना मानणारा मोठा वर्ग आहे. संघटनेवर पकड असणारी ही व्यक्तीमत्व आहेत. महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारात हे दोन्ही संघटक उतरले असून केसरकरांच्या गाडीत संजू आणि महेश एकत्र पहायला मिळत आहेत. सावंतवाडी मतदारसंघात प्रचार शुभारंभांनंतर महायुतीने आघाडी घेतली आहे.