
सावंतवाडी : मला निलेश राणेंसारख बोलता येत नाही. युतीत मिठाचा खडा टाकण्याचा माझा हेतू नाही. मात्र, स्थानिक पातळीवर वेगळी विधान येतात. तोडायच असेल तर आमच्याकडून तुटलं असं नको. मैत्रीचा धर्म आम्ही जाणतो. सोबत आले तर सोबत. अन्यथा, त्यांच्या शिवाय लढावं लागेल असं मत माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.
सावंतवाडी येथील शिवसेना पदाधिकारी कार्यकर्ते मार्गदर्शन मेळाव्यात ते बोलत होते. श्री. केसरकर पुढे म्हणाले, महायुती झाली तर ती वेळेत झाली पाहिजे. नारायण राणे आमचे खासदार आहेत. त्यांनाही मान दिला गेला पाहिजे. महायुती न झाल्यास दुसऱ्याला संधी मिळता नये याचीही काळजी घेतली पाहिजे. ही निवडणूक कार्यकर्त्यांची आहे. तुमच्या प्रचाराला मी फिरणार आहे. बळ एकीत आहे, स्वबळावर विचार करताना अनेक इच्छुक आहेत. त्यामुळे एकमताने उमेदवार द्या, मतभेद ठेवू नका. विजय निश्चितच होईल असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.










