
सावंतवाडी : उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे तालुकाप्रमुख मायकल डिसोझा यांची माजी शालेय शिक्षण, मराठी भाषा मंत्री दीपक केसरकर यांच्यावर टीका करण्याची पात्रता नाही. आम. केसरकरांवर टीका करण्यापूर्वी त्यांनी आपल्या जिल्हा परिषद मतदारसंघात झालेला विकास आम. केसरकर यांनीच केला, याची जाणीव टीका करण्यापूर्वी मायकल डिसोझा यांनी ठेवावी असा पलटवार युवासेना सावंतवाडी विधानसभा प्रमुख अर्चित पोकळे यांनी श्री. डिसोझा यांना लगावला.
तालुकाप्रमुख श्री. डिसोजा यांनी सर्वप्रथम स्वतःचा जिल्हा परिषद मतदारसंघ सांभाळावा. तेथील ग्रामस्थांना न्याय द्यावा. पक्षातील वरिष्ठांना खूष करण्यासाठी माजी मंत्री, आमदरा दीपक केसरकर यांच्यावर नाहक टीका करू नये. आम. केसरकर यांनी केलेले कार्य जनतेला ठावूक आहे. म्हणूनच, चौथ्यांदा आमदार म्हणून निवडून देण्याच काम सावंतवाडी मतदारसंघातील मतदारांनी केले आहे. त्यामुळे केसरकरांवर टीका करण्यापूर्वी आत्मचिंतन करावे. यापुढे केसरकरांवर नाहक टीका केल्यास जशासतसे उत्तर दिले जाईल असा इशारा श्री. पोकळे यांनी देत विरोधकांचा खरपूस समाचार घेतला.