
सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार तथा शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी पक्षप्रवेशांचा धडाका लावला आहे. उद्धव बाळासाहेब ठाकरे यांच्या शिवसेनेला ते धक्क्यावर धक्के देत आहेत. मळगाव येथील शिवसेना उपविभाग प्रमुख महेश शिरूरकर यांनी आपल्या कार्यकर्त्यांसह दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत शिवसेनेत प्रवेश केला आहे.
विधानसभा मतदारसंघ प्रमुख रूपेश राऊळ यांचे ते निकटवर्तीय होते. महाविकास आघाडीकडून उमेदवार आयात केल्यानंतर ते नाराज होते. अखेर दीपक केसरकर यांच्या उपस्थितीत मळगाव येथील शिवसेना उपविभाग प्रमुख महेश शिरूरकर यांनी आपल्या सहकाऱ्यांसह शिवधनुष्य हाती घेतले. यावेळी शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, तालुकाप्रमुख नारायण राणे, विशाल सावंत, शंकर कुंभार, साक्षी शिरोडकर, मयंग शिरोडकर, श्री. नाईक, नंदू शिरोडकर आदी उपस्थित होते.