दीपक केसरकरांनी हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावावा : रवी जाधव

Edited by:
Published on: November 25, 2024 18:40 PM
views 152  views

सावंतवाडी : दीपक केसरकर यांचे सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानकडून अभिनंदन करण्यात आले असून आता आमच्या हॉस्पिटलचा प्रश्न मार्गी लावावा अशी मागणी रवी जाधव यांनी केली आहे. सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयात रुग्णांना उपचार मिळत नसल्याने गोवा बांबुळी हॉस्पिटलमध्ये नेण्याचा सल्ला दिला जातो. रात्री अपरात्री १०८ रूग्णवाहिका देखील वेळेत उपलब्ध होत नाही. यावेळी वैद्यकीय अधीक्षक डॉक्टर गिरीश चौगुले यांनी सतर्कता दाखवून हॉस्पिटलची विनामूल्य ॲम्बुलन्स उपलब्ध करून दिली. त्यानंतर रात्री दोन वाजता पेशंटला गोवा बांबुळी येथे हलवण्यात आले.

येत्या काळात मल्टिप्लेक्स हॉस्पिटलचे काम सुरू करावे. परंतु, सध्यस्थितीमध्ये सावंतवाडी उपजिल्हा रुग्णालयामध्ये दीपक केसरकर यांनी तत्काळ दोन तरी परमनंट जनरल सर्जन डॉक्टर उपलब्ध करून द्यावेत अशी मागणी सामाजिक बांधिलकीन केली आहे. सामाजिक बांधिलकी प्रतिष्ठानचे अध्यक्ष सतीश बागवे, उपाध्यक्ष शैलेश नाईक, रवी जाधव ,रूपा मुद्राळे, समीरा खलील, हेलन निबरे, संजय पेडणेकर, अशोक पेडणेकर श्यामराव हळदणकर, शेखर सुभेदार व जीवन रक्षा वैद्यकीय प्रतिष्ठानचे अध्यक्ष राजू मसुरकर तसेच माजी आमदार कै.जयानंद मठकर यांची सून सीमा मठकर यांच्या माध्यमातून रुग्णांच्या सेवेसाठी हॉस्पिटलला शक्य होईल तेवढ्या सोयी सुविधा पुरवण्याचे काम सातत्याने या संस्थेनमार्फत होत असतं. या सेवाभावी संस्थेच्या माध्यमातून सर्वप्रथम रुग्णालयात दोन सर्जन डॉक्टर, स्टाफ व नेहमीच कमी होत असणारा औषधांचा पुरवठा हे गंभीर प्रश्न लवकरात लवकर सोडवून रुग्णांना व हॉस्पिटल हे मंदिर समजून आपला महत्त्वाचा वेळ व विनामूल्य सेवा देणाऱ्या सदर सेवाभावी संस्थेंना सहकार्य करावे अशी विनंती करण्यात आली आहे.