सावंतवाडी : रवींद्र चव्हाण यांच विधान ऐकलेलं नाही. मात्र, भाजप आणि शिवसेना कायम एकत्र राहावी हीच माझी भूमिका आहे. काही निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात. त्यामुळे विनाकारण कटुपणा येऊ नये असं विधान माजी मंत्री, शिवसेना आमदार दीपक केसरकर यांनी केलं. भाजपचे कार्यकारी अध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी निवडणूका कमळा शिवाय होऊ नये या केलेल्या विधानाबाबत विचारले असता श्री. केसरकर बोलत होते.
दीपक केसरकर म्हणाले, रवींद्र चव्हाण यांचे विधान ऐकलेलं नाही. काहीकाळ बंगल्याचे शिफ्टींग सुरू असल्यानं मी इथे नव्हतो. मध्यंतरीच्या काळातली माहिती घेऊन मी बोलेन. मात्र, भाजप आणि शिवसेना कायम एकत्र राहावी हीच माझी भूमिका आहे. दोन्ही पक्षांनी एकत्र राहून निवडणूका लढवाव्यात. शक्यतो, उबाठा शिवसेनेची लोक प्रवेश करून आली तर आनंद आहे. तसेच काही निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरतात. त्यामुळे विनाकारण कटुपणा येऊ नये असंही मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.