
वेंगुर्ला : शिवसेना- भाजप- राष्ट्रवादी - आरपीआय महायुतीच्या सप्तसागर अपार्टमेंट येथील प्रचार कार्यालयाचे उदघाटन उद्या गुरुवार दिनांक ७ नोव्हेंबर रोजी सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण, शालेय शिक्षण मंत्री तथा सावंतवाडी विधानसभा मतदार संघाचे महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, आमदार नितेश राणे यांच्या प्रमुख उपस्थितीत होणार आहे.
यावेळी भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, राष्ट्रवादी जिल्हाध्यक्ष अबीद नाईक, आरपीआय जिल्हाध्यक्ष यांच्यासाहित महायुतीचे सर्व प्रमुख पदाधिकारी उपस्थित राहणार असून महायुतीच्या सर्व पदाधिकारी कार्यकर्त्यांनी उपस्थित राहण्याचे आवाहन शिवसेना तालुकाप्रमुख नितीन मांजरेकर यांनी केले आहे.