दीपक केसरकर चौथ्यांदा आमदार होणार : पल्लवी केसरकर

Edited by: विनायक गांवस
Published on: October 29, 2024 10:14 AM
views 159  views

सावंतवाडी : दीपक केसरकर यांनी केलेल्या कामामुळे जनतेचे आशीर्वाद त्यांच्यासोबत आहेत. सलग तीनवेळा निवडून देत येथील जनतेने इतिहास रचला आहे. जनतेचे आशीर्वाद व प्रेम यामुळे ते चौथ्यांदा बहुमताने निवडून येतील अशी खात्री आहे असा विश्वास माजी नगराध्यक्ष पल्लवी केसरकर यांनी व्यक्त केला.

 महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी कुटुंबासह नामनिर्देशन पत्र दाखल केल. यानंतर सौ. केसरकर बोलत होत्या. यावेळी त्यांची कन्या सोनाली वगळ, जावई सिद्धार्थ वगळ व नातू उपस्थित होते.