
सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारासाठी सावंतवाडी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची सभा होतेय. यानिमित्ताने दीपक केसरकर यांनी आपलं मनोगत व्यक्त केलं.
खोटं बोलून नरेटीव्ह सुरू करण्याची एक परंपरा देशात सुरू झाली आहे. राज्य घटनेत बदल होणार अशा खोट्या अफवा पसरवल्या गेल्या. लोकांची यात फसगत झाली. मात्र, यावेळी आम्ही सावध आहोत. खोटं बोलण्याचा प्रकार आजही सुरू आहे. मी पंधरा वर्षांत काय केलं हे बाजूला ठेवा मागच्या पाच वर्षात पंचवीशे कोटी रुपये निधी आणला. मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. ज्या रस्त्यावरून हे प्रचाराला गावागावात जातात ते रस्ते मी निर्माण केले. उद्धव ठाकरे साईबाबांवर बोलले. महाराष्ट्राचे मुख्यमंत्री म्हणून शपथ घेताना साईबाबांच्या आशीर्वादाने हे झालं असे रश्मी ठाकरे म्हणाल्या. माझ्या दैवताचा अपमान सहन करणार नाही. मुख्यमंत्री असताना उद्धव ठाकरे यांनी कबुलायतदार गांवकर प्रश्नाला स्थगिती दिली. नारायण राणेंनी शिवसेना सोडली तेव्हा शिवसेनेला ४५ हजार मत पडत होती. मला पहिल्यांदा आमदार बनविण्यात नारायण राणेंचा पाठिंबा होता. शिवसेनेत राज्यमंत्री असताना उत्कृष्ट सेवा मी दिली. आठ वेळा महाराष्ट्राच बजेट मी मांडले आहे. मंत्रीपद दिलं नाही तरीही उद्धव ठाकरेंसह राहीलो. युती मोडायच काम उद्धव ठाकरेंनी या जिल्ह्यात केल. म्हणून दोन अपक्ष उमेदवार भाजपने दिले. मल्टिस्पेशालीटीला मान्यता देवेंद्र फडणवीस यांनी दिली ठाकरेंनी नाही. पाणबुडीचा निधी आदित्य ठाकरे वापरू शकले नाहीत. इथे येऊन विनाकारण टिका करू नका. गोल्फ कोर्स म्हणजे काय हे सुद्धा त्यांना ठाऊक नाही. मल्टिस्पेशालीटीचा प्रश्न सुटला आहे. सावंतवाडी दिसणारा विकास कोणी केलाय हे जनतेला माहीत आहे. स्टॉलधारकांना मालकीची दुकान दिली. गाडगेबाबांच्या नावानं भव्य मार्केट उभं राहतं आहे. क्रीडा संकुल, मटण मार्केट, ओपन जिम, ५० कोटीची नळपाणी योजना आम्ही आणली आहे. ४ कोटीचा दुबईच्या धर्तीवर म्युझिकल फाऊंटन सावंतवाडीत मंजूर केला. मोनोरेल देखील मंजू आहे. सावंतवाडी, वेंगुर्ला, दोडामार्ग आदी भागात विकास केला. सर्वसामान्य जनतेला अपेक्षित विकास केला. घाट रस्ते तयार केली. किनारपट्टीवर पर्यटन होत आहे. पर्यटन हा आपला आत्मा आहे. पहिल्या पंचतारांकित हॉटेलचा शुभारंभ माझ्या मतदारसंघात करण्यात आला आहे. ताज हॉटेलचे भुमिपूजन देखील झाले आहे. ६०० मूलांना येथे रोजगार मिळणार आहे. १५० कुटुंबांना त्यांच्या मालकीची हॉटेल सुरू करून दिली आहेत. शेतकऱ्यांसाठी विविध योजना राबविण्यात आल्या. नव्या तंत्रज्ञानाची जोड दिली. महिला बचत गटांना प्रोत्साहन दिले. आडाळी एमआयडीसी नारायण राणेंनी स्थापन केली. त्याठिकाणी रस्ते, वीज, पाणी आणले. येत्या काळात शेकडो लोकांना तिथे रोजगार मिळणार आहे. पै काणेंच्या फॅक्टरीत ३०० हून अधिक मुलं कार्यरत आहेत. टेंडरच्यावेळी बाउंसर पाठविणारे हे लोक आहेत. यांना सामान्यांचे दुःख कळणार नाही. मार खाल्लेले लोक पांढरे कपडे घालून फिरत आहेत. शेतकऱ्यांच्या जमीनी बळकावण्याच काम केलं. दुसरे उमेदवार खोटं बोलण्याच काम करत आहेत. मी ज्या लोकांना मोठं होण्यासाठी प्रोत्साहन दिलं ते विरोधात बोलतात तेव्हा दुःख होत.
मुंबईचा पालकमंत्री असताना जर्मनीशी करार केला. इथल्या कौशल्य प्राप्त मुलाला भरघोस पगाराच्या नोकऱ्या तिथे मिळणार आहेत. वर्षाला ३६ लाख त्यांना मिळणार आहे. जर्मन भाषेच शिक्षण जिल्ह्यात देत आहोत. जर्मनीला जाणाऱ्या दीडशे पैकी सव्वाशे मुलं सिंधुदुर्गातील आहेत. महिला, शेतकरी यांच्यासाठी मी अनेक योजना राबविल्या. माझ्यावर टीका करणाऱ्या विरोधकांना तुम्ही उत्तर दिले पाहिजे. शिक्षणमंत्री म्हणून क्रांतीकारी निर्णय घेतले. ६६ हजार शिक्षकांना टप्पा अनुदानावर आणलं. ३० हजार शिक्षकांची भरती केली. मराठी भाषेला अभिजात भाषेचा दर्जा मिळवून दिला. मी असंख्य काम मतदारसंघात केली. त्यामुळे खोट्या प्रचाराला बळी पडू नका. उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांची भेट मी घडवून आणली. शिवसेना संपवण्यासाठी महाविकास आघाडी काम करताना मी ती भेट घडवली. मला मंत्रीमंडळातून काढून माझ्या जनतेचा अपमान उद्धव ठाकरे यांनी केला. एकनाथ शिंदे गेले तेव्हा मातोश्रीवर गेलो. शिंदेना समजवण्यासाठी पुढाकार घेतला असता तुम्ही सुद्धा निघा असं सांगणारे आम्हाला गद्दार म्हणत आहे.
शेतकऱ्यांना ५० हजारांचा दंड करताना सिंधुदुर्ग जिल्हा वगळावा अशी मागणी मी केली होती. काही झाड त्यातून वगळण्यात आली आहेत. माझ्या कुटुंबातील कोणीही राजकारणात नव्हता. तुमच्यामुळे मी आमदार झालो. माझ्यावर प्रॉपर्टीवरून टीका होते. मात्र, ही संपत्ती माझ्या वाडवडीलांची आहे. महायुती सरकारने लाडकी बहीण, मोफत स्त्रीशिक्षण, आरोग्य आदींसह विधायक योजना राबविल्या त्या सरकारला मतदान करा असे आवाहन त्यांनी केले. काम कशी करून घ्यायची हे नारायण राणेंना माहित आहे. पैसे कसे आणायचे हे मला ठावूक आहे. आम्ही दोघे मिळून जिल्ह्याचा सर्वांगीण विकास करू. चार दिवस मला द्या, पुढची पाच वर्षे तुमची अखंडीत सेवा करेन, असं आश्वासन त्यांनी दिलं.