नांगरतास शाळेचं दीपक केसरकरांनी केलं कौतुक

Edited by: विनायक गांवस
Published on: March 28, 2025 13:24 PM
views 170  views

सावंतवाडी : "आज शिक्षण क्षेत्रात बदल केले जात असून राज्य सरकार कौशल्यावर आधारीत शिक्षण देण्यावर भर दिला जात आहे ज्यामुळे भारतीय मुलांना परदेशात चांगल्या संधी मिळत आहेत. नांगरतास शाळेने यावर भर दिला जात असल्याचे मत माजी शिक्षणमंत्री आमदार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. आज केसरकर यांनी नांगरतास शाळेच्या भेटीत ते बोलत होते.

राज्याचे उपमुख्यमंत्री अजित पवार आणि वैद्यकीय शिक्षण मंत्री हसन मुश्रीफ यांनी गुरुवारी आंबोली नांगरतास येथील वसंतदादा इन्स्टिट्युट ला भेट दिली. यावेळी राज्याचे माजी शिक्षणमंत्री विद्यमान आमदार दीपक केसरकर नांगरतास येथील मैदानावर उपस्थित होते. यावेळी बाजूलाच असणाऱ्या जिल्हा परिषद शाळा आंबोली नांगरतास शाळेला केसरकर यांनी आवर्जून भेट दिली. यावेळी  आंबोली गावच्या सरपंच सावित्री पालेकर व शालेय व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष संतोष पडवळ यांनी त्यांचे स्वागत केले. दरम्यान शिक्षक सागर पाटील व शाळा व्यवस्थापन शिक्षणातज्ञ वामन पालेकर यांनी शाळेतील वर्षभराचा आढावा केसरकर यांना सांगितला.

यावेळी बोलताना आम. दीपक केसरकर म्हणाले, आज शिक्षण देताना कौशल्यावर आधारित शिक्षण देणे गरजेचे आहे. घोकमपट्टीवर आधारित शिक्षणाला महत्व नाहीं. त्यामुळे  पारंपरिक शैक्षणिक पद्धत न वापरता आधुनिक, डिजिटल आणि कौशल्यपूरक शिक्षणाला अधिक प्राधान्य देणे गरजेचे आहे.आज या शिक्षणाच्या माध्यमातून मुलांना परदेशात चांगल्या संधी मिळत असल्याच केसरकर यांनी सांगितले.

दरम्यान नवोदय साठी निवड झालेल्या आंबोली नांगरतास शाळेच्या कु.तनिष्का नार्वेकर व कु.भूमी कर्पे या विद्यार्थिनींचा सत्कार करण्यात आला. यावेळी सावंतवाडी नगरपरिषदेचे  माजी नगराध्यक्ष संजय परब, मुख्याध्यापिका संगीता गुडूळकर, शिक्षक अमोल कोळी, रुपाली मोरे व सागर पाटील उपस्थित होते.