
सावंतवाडी : शिवसेनेकडून नगराध्यक्षासाठी महिला जिल्हाप्रमुख ॲड. निता सावंत-कविटकर यांना उमेदवारी जाहीर करण्यात आल्याची घोषणा माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर यांनी केली. तसेच युती तुटलेली नाही, युती झाल्यास काही अर्ज मागे घ्यावे लागतील याची कल्पना उमेदवारांना दिल्याचे त्यांनी स्पष्ट केले.
महिला जिल्हाप्रमुख म्हणून त्यांनी चांगली संघटना बांधली आहे. सर्वसामान्य कुटुंबातील त्या आहेत. उच्च विद्याविभूषित त्या आहेत. एका उच्चशिक्षित कुटुंबातील गृहिणीला आम्ही उमेदवारी जाहीर केली आहे याचा आनंद आहे. युती तुटलेली नाही आहे. युती झाल्यास अर्ज मागे घ्यावे लागतील याची कल्पना काही उमेदवारांना दिली आहे. २२ अधिक १ असे २३ उमेदवारी अर्ज आम्ही दाखल करणार आहोत. महिला नगराध्यक्ष आरक्षण नसताना आम्ही महिला नगराध्यक्षा बसवली. तोच वारसा ॲड. सावंत- कविटरक पुढे घेऊन जातील. सावंतवाडीकरांच माझ्यावर प्रेम असून ४ वेळा आमदार केलं आहे. तेच प्रेम यावेळी देखील दाखवतील असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला.










