
सावंतवाडी : पीएम मोदी, सीएम फडणवीस, खासदार नारायण राणेंची साथ आम्हाला आहे. भाजपला आशीर्वाद दिल्यास पुढच्या ५ वर्षांत देशातील आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून सावंतवाडीचा विकास करून दाखवू, निधीची कमतरता भासणार नाही. सत्तेत आम्ही आहोत, जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आहेत. त्यामुळे समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना आशीर्वाद द्यावेत असं आवाहन मंत्री नितेश राणेंनी केलं. या निवडणूकीकडे राजकारणाच्या पलिकडे बघित राजघराण इच्छुक असल्याने बिनशर्त पाठिंबा मिळण आवश्यक होतं. निदान माजी मंत्री आमदार दीपक केसरकर यांच्याकडून ती अपेक्षा होती असा टोला श्री. राणे यांनी हाणला. आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
मंत्री राणे म्हणाले, श्री देव पाटेकराचा आशीर्वाद घेऊन प्रचाराचा शुभारंभ केला आहे. ही निवडणूक शहराच्या विकासासाठी महत्वाची आहे. चारही निवडणूकात भाजपला शहराचा विकास महत्वाचा आहे. सावंतवाडी 'रोल मॉडेल ठराव' यासाठी आमचा प्रयत्न आहे. सावंतवाडीला ऐतिहासिक वारसा असून आता सत्तेची जोड त्याला द्यायची आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, प्रदेशाध्यक्ष रविंद्र चव्हाण, पालकमंत्री म्हणून मी स्वतः आहे. भाजपला आशीर्वाद दिल्यास पुढच्या ५ वर्षांत देशातील आणि राज्यातील सत्तेच्या माध्यमातून सावंतवाडीचा विकास १०० टक्के करू असे त्यांनी सांगितले. निधीची कमतरता भासणार नाही. सत्तेत आम्ही आहोत, जिल्ह्याच्या आर्थिक चाव्या पालकमंत्री म्हणून माझ्याकडे आहेत. त्यामुळे समाजसेवेचा वारसा पुढे घेऊन जाणाऱ्या युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांना आशीर्वाद द्यावेत असं आवाहन केलं. पोटनिवडणुकीत पूर्णकाळ भेटला नाही. आता ५ वर्ष संधी द्यावी, तेव्हा मी आमदार होतो आता मात्र पालकमंत्री आहे. राजघराण्याचा इतिहास आणि सत्तेची जोड या साथीन आम्ही विकास करू, आदर्श शहर बनवू असे मत त्यांनी व्यक्त केले. तसेच युतीचा निर्णय वरिष्ठ पातळीवर ठरणार आहे. भाजप हा राष्ट्रीय पक्ष आहे. कार्यकर्ते म्हणून आम्ही वरिष्ठांचे आदेश पाळतो आहे.
केसरकरांकडून अपेक्षा होती !
ते पुढे म्हणाले, युवराज्ञी श्रद्धाराजे भोंसले यांनी इच्छुक असल्याचे सांगितल्यानंतर दीपक केसरकर यांच्याकडून अपेक्षा होती. राजघराण्याशी त्यांच नातं आहे. सावंतवाडीला राजघराण्यानं भरपूर दिलं आहे. दीपक केसरकर यांनाही आशीर्वाद दिलाय. ही निवडणूक राजकारणाच्या पलिकडे बघितले पाहिजे, बिनशर्त पाठिंबा देत राजघराण्याची परतफेड करण आवश्यक होते. सावंतवाडीची अस्मिता राजघराण आहे. आरोग्य, पाण्याची व्यवस्था त्यांनीच उपलब्ध करून दिली. अशावेळी त्या घराण्याच्या व्यक्तीला सगळ्या राजकीय पक्षांनी साथ देण आवश्यक आहे. राजघराण्यानं कोणतीच अपेक्षा ठेवली नाही. त्यामुळे आज उत्स्फूर्तपणे प्रत्येकान बिनशर्त पाठिंबा देण्यासाठी पुढे यायला हवं होतं असही त्यांनी सांगितले.
ठाकरेंच्या सेनेचे मानले आभार !
कंटेनर थिएटरची आठवण करून दिली याबद्दल उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे आभारी आहे. आमच्या उमेदवार निवडून आल्यानंतर पहिली ५ काम कोणती करावी याची आठवण करून दिल्याबद्दल धन्यवाद देतो. तेव्हा मी आमदार होतो. काही अडचणी आल्या, त्यावर कधीतरी बोलेन. मात्र, बोलण्याची आणि रडण्याची ही वेळ नाही. ५ वर्ष संधी मिळत असेल तर पालकमंत्री म्हणून माझ्यासाठी विकास करण्याची संधी चालून आली आहे.
शिंदे-ठाकरे सेना राणेंच्या कणकवलीत एकत्र !
दरम्यान, कणकवलीतील चित्र नवीन नाही. कणकवलीकर नेहमी नारायण राणे यांच्यासह राहिलेत. जे कोणाला जमलं नाही ते कणकवलीन करून दाखवल आहे. शिंदे आणि ठाकरेंच्या सेना तिथे एकत्र आल्यात. कुणी कोणासोबत लढावं यावर माझा आक्षेप नाही. जनता सुज्ञ आहे, सगळ्या गोष्टींच स्वागत करतो. आम्ही विकासाचा मुद्दा घेऊन जाणार आहोत. महायुतीत वैयक्तिक, राजकीय टीका आम्ही करणार नाही. आमच्याकडून विकासाचच उत्तर मिळेल. माझ नाव नितेश नारायण राणे असून चक्रव्यूहात कसं भेदायच यात पीएचडी केली आहे. भाजपात मी नाही तर आम्ही असतो. जनतेसमोर आम्ही जात असून जनता निर्णय ठरवणार आहे. तसेच श्रद्धाराजे भोंसले, मराठी शिकण्याचा प्रयत्न करत आहेत. सावंतवाडीत आल्यावर संस्कृती स्वीकारली आहे. भाषा शिकण्याचा प्रयत्न करतात याचं कौतुक केले पाहिजे. अन्यही बदनामीचे प्रकार होत आहेत. निवडणूका येतील जातील जिल्ह्यातील माता भगिनींचा अपमान निवडणूकीसाठी कोणी करू नये. दीपक केसरकर यांनी तशी समज कार्यकर्ते, नेत्यांना द्यावी, कोणत्याही महिलेचा अपमान सहन केला जाणार नाही. सावंतवाडीकर २ डिसेंबरला उत्तर देतील. मराठी शिकत आहे याच कौतुक झालं पाहिजे. प्रत्येकाला निवडणूक लढवण्याच स्वातंत्र्य आहे. निलेश राणे शिवसेनेचे नेते आहेत. शहर विकास आघाडीला पाठिंबा दिला असल्याने त्यांना प्रचारात उतरावं लागेल. आम्ही मैत्रिपूर्ण लढाई करत असून प्रगल्भ आहोत. आई वडीलांनी चांगले संस्कार दिलेत. ज्या पक्षात आम्ही काम करतो तिथे १०० टक्के न्याय देतो. निलेश राणे देखील ते काम करत आहे. तस केलं नसतं तरीही टीका झाली असती. निवडणूकीत प्रत्येकाला स्वातंत्र्य आहे असे मत मंत्री राणेंनी व्यक्त केले. यावेळी युवराज लखमराजे भोंसले, भाजप महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, जिल्हा बँक अध्यक्ष मनिष दळवी, संध्या तेरसे, शेखर गावकर, प्रमोद गावडे आदींसह भाजप पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.
सावंतवाडीकर असल्याचा अभिमान: श्रद्धाराजे भोंसले
सावंतवाडीकर असल्याचा मला अभिमान आहे. राजकारणात फक्त सावंतवाडीची सेवा करण्यासाठी मी उतरले आहे. भाजपन मला आशीर्वाद दिला असून मला एक संधी द्या, काम करून दाखवीन असा विश्वास नगराध्यक्ष पदाच्या उमेदवार श्रद्धाराजे भोंसले यांनी व्यक्त केला.











