
सावंतवाडी : शिवसेनेचे प्रभाग ६ चे उमेदवार दुर्गेश उर्फ देव्या सुर्याजी व शर्वरी धारगळकर यांच्या प्रचारासाठी माजी मंत्री, आमदार दीपक केसरकर मैदानात उतरले. त्यांनी कॉर्नर बैठक घेत नगराध्यक्षपदासाठी उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर तसेच नगरसेवकांना निवडणूक देण्याचे आवाहन केले.
यावेळी श्री. केसरकर म्हणाले, शहरात विकास सुरू आहे. भाजी मंडई, मच्छी मार्केट, मटण मार्केट, क्रिडा संकुलसह २४ तास पाण्याची व्यवस्था केली आहे. विकासकाम प्रत्यक्षात सुरू आहे. विकासकामांच्या जीवावर आम्ही मत मागत आहोत. सावंतवाडीकर शिवसेनेच्या पाठीशी राहतील, जनतेच प्रेम आमच्यावर आहे अस मत त्यांनी व्यक्त केल. तर शहरातील शांतता टिकवून ठेवण्यासाठी शिवसेनेचे उमेदवार निवडून द्या असे आवाहन श्री. केसरकर यांनी केल. यावेळी शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाच्या उमेदवार ॲड. निता सावंत-कविटकर, उमेदवार देव्या सूर्याजी, शर्वरी धारगळकर, हमू राजगुरू, महेश देऊलकर, परिक्षीत मांजरेकर, सुधीर धुमे, शैलेश वेंगुर्लेकर, ॲलेक्स रॉड्रीक्स आदींसह शिवसेना पदाधिकारी, कार्यकर्ते उपस्थित होते.











