दीपक केसरकरांनी सहकुटुंब बजावला मतदानाचा हक्क

Edited by:
Published on: November 20, 2024 10:54 AM
views 755  views

सावंतवाडी : राज्याचे शालेय शिक्षणमंत्री तथा महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी सहकुटुंब मतदानाचा हक्क बजावला. सावंतवाडीकरांच प्रेम मला नेहमी लाभलं आहे. गृहराज्यमंत्री पुन्हा निवडून येत नाही असा इतिहास आहे. मात्र, सावंतवाडीकरांनी इतिहास बदलून दाखवला. त्यांच्या प्रेमामुळेच विजयाचा चौकार मारेन असा विश्वास महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केला‌.

ते म्हणाले, सावंतवाडीकरांच प्रेम मला नेहमी लाभलं आहे. दोनवेळा सेना-भाजप अशी लढाई झाली होती‌. आता आम्ही एकत्र आहोत. सावंतवाडीकर माझ्या सोबत आहेत. तिनवेळा निवडून देत मतदारांनी रेकॉर्ड केलाय. आता सावंतवाडीकरांच्या प्रेमामुळे चौकार मारेन असा विश्वास त्यांनी व्यक्त केला. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे स्वतः माझ्या प्रचारासाठी आले होते. मतदारसंघासह जिल्ह्याचा विकास करण्यासाठी आम्ही कटिबद्ध आहोत. लोकसभे प्रमाणे चांगलं मताधिक्य मला जनता देईल असा विश्वास दीपक केसरकर यांनी व्यक्त केला‌. यावेळी माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर, सौ. सोनाली केसरकर-वगळ, सिद्धार्थ वगळ, नातू अर्जून वगळ आदी उपस्थित होते. विशेष म्हणजे मतदान झाल्यानंतर सहकुटुंब सेल्फी काढून मतदारांना मतदान करण्याचे असे आवाहन केले.