
सावंतवाडी : सावंतवाडी रोड रेल्वे स्थानकावर टर्मिनस व्हावे आणि प्रवाशांची गैरसोय टाळण्यासाठी सावंतवाडी मतदारसंघातील प्रवासी, नागरिक व व्यापाऱ्यांच्या उपस्थित चर्चा करून सावंतवाडी टर्मिनस कृती समिती व प्रवासी संघटनेची स्थापना करण्यात आली. यावेळी मुडरा अन् सावंतवाडी टर्मिनसच्या वादाप्रसंगी प्रतिष्ठेचा मुद्दा करणारे विद्यमान शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर सत्तेत आल्यापासून रेल्वे टर्मिनसप्रश्नी गप्प का ? का असा सवाल समितीचे अध्यक्ष संदिप निंबाळकर यांनी केला होता.
याबाबत विचारलं असता दीपक केसरकर म्हणाले, रेल्वे राज्यमंत्री रावसाहेब दानवे यांच्यासोबत भेट मागितली आहे. त्यांच्यासमोर आम्ही हे सर्व विषय ठेवणार आहोत. लवकरच आम्हाला न्याय मिळेल असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. दक्षिण कोकणचं पंढरपूर सोनुर्ली येथे श्री देवी माऊलीच दर्शन घेतल्यानंतर ते पत्रकारांशी बोलत होते. यावेळी त्यांच्या सौभाग्यवती माजी नगराध्यक्षा पल्लवी केसरकर सोबत उपस्थित होत्या.