सावंतवाडीकरांचे दीपक केसरकरांनी मानले आभार

टीजेएसबीच्या उद्घाटन सोहळ्यास उपस्थित राहण्याचे आवाहन
Edited by: विनायक गावस
Published on: May 12, 2025 23:47 PM
views 53  views

 सावंतवाडी :  अर्बन को-ऑपरेटिव बँक लिमिटेड सावंतवाडीचे टी.जे. एस. बी मध्ये विलीनीकरण होत आहे. ७८ वर्ष सावंतवाडीकरांना सेवा देत असताना सर्व बँक ग्राहकांनी, सभासदांनी तसेच संचालक मंडळानी दिलेल्या साथीसाठी माजी मंत्री, आम दीपक केसरकर यांनी सर्वांचे आभार मानले आहेत. तसेच उद्या ११ वा. टीजेएसबी बँकेच्या १५० व्या शाखेचा उ‌द्घाटन समारंभास उपस्थित राहावे असे आवाहन श्री.केसरकर यांनी केले आहे.

ते म्हणाले, गेल्या ५३ वर्षांपासून ही बॅक सेवेत आहे. आजमितीस बँकेच्या १४९ शाखा कार्यरत असून सावंतवाडी येथे बँकेच्या १५० व्या शाखेचा उ‌द्घाटन समारंभ संपन्न होत आहे. सावंतवाडी अर्बन बँक ही सिंधुदुर्ग जिल्ह्यातील सर्वात जुनी सहकारी संस्था होती. या माध्यमातून गेली ७८ वर्ष सेवा दिली. यासाठी साथ देणाऱ्या ग्राहक, सभासदांसह संचालकांचे आभार मानतो. ही बँक टी.जे. एस. बीचा माजी केंद्रीय मंत्री सुरेश प्रभू यांच्या शुभहस्ते उद्घाटन सोहळा संपन्न होणार आहे. यावेळी उपस्थित राहण्याचे आवाहन आम. दीपक केसरकर यांनी केले आहे.