
सावंतवाडी : विरोधात 2 परब उभे होते. पण, 4 परब माझ्यासोबत होते. त्यामुळे आपला विजय निश्चित आहे असा विश्वास व्यक्त करत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, खासदार नारायण राणे, मंत्री रविंद्र चव्हाण यांसह महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे आभार महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी मानले. दिवसरात्र तुम्ही घेतलेल्या सोप्पी नसणारी निवडणूक सोप्पी झाली. त्यामुळे येणारा विजय हा तुमचा असेल असे मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.
ते म्हणाले, अनेक उमेदवार हे सातत्याने इथून तिथे तिथून इथे उड्या मारत होते. काही लोकांना देवेंद्र फडणवीस यांचा फोन माझ्यामुळे आला. नाहीतर आयुष्यात यांना फोन आला नसता. त्यांच्या तक्रारी गृहमंत्र्यांकडे जातात. दोन उमेदवारांपैकी एकावर मनी लॉड्रींगची तर दुसऱ्यावर जमीनी हडप केल्याची केस होती. वाईट लोकांच्या भोवतीच कवच या निवडणूकीत गळून पडल असं श्री. केसरकर म्हणाले. माझ्याविरोधात दोन परब होते पण, चार परब सोबत होते. युवराज लखमराजे भोंसले, संजू परब, विद्याधर परब, सुरज परब, मनिष दळवी, महेश सारंग, राजन पोकळे आदींसह मेहनत घेतलेल्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांचे त्यांनी यावेळी आभार मानले. तर सावंतवाडीचे 'मॅन ऑफ द मॅच' संजू परब आहेत तसेच वेंगुर्ल्याचे मनिष दळवी आहेत. मागच्यावेळी संजू परब आले असते तर आज तेच आमदार असते. मी यावेळी लोकसभेचा उमेदवार असणार असतो. नारायण राणे त्यावेळी इच्छुक नव्हते. मी लोकसभेला गेलो असतो तर विधानसभा तेलींना मिळेल असं सांगितलं गेलं होतं. पण, भाजपच्या बैठकीत मला लोकसभेला विरोध करून विधानसभेचा आग्रह धरला. हा मनुष्य भाजपला, शिवसेनेला मान्य नाही. त्यामुळेच उबाठाचे प्रमुख नेते प्रचारात दिसले नाही. या माणसाने हे समजून घेतले पाहिजे. मुलांना सुद्धा रात्रीचे बॅनर लावू नका म्हणून सांगितलं पाहिजे असा टोला हाणला.
दरम्यान, कपिलदेवचे पैसे दिले नाही तर बॅटने मारेल अन नागार्जुन लुंगी डान्स करायला लावेल असाही टोला त्यांनी यावेळी हाणला. मी एकटा राहतो अन् फिरतो. आजूबाजूला बाऊन्सर ही सावंतवाडीची संस्कृती नाही. तसेच ही निवडणूक सोप्पी नव्हती. पण, महायुतीच्या पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी सोपी केली. येणाऱ्या काळात रोजगारासाठी माझा भर असेल. मल्टीस्पेशालिटीच स्पेलिंग सुद्धा यांना येत नाही. टुडे, टुमारोतला अर्थ न कळणारे हे विद्वान आहेत असाही खोचक टोला हाणला. अशी माणसं मतदारसंघात येता नये. सावंतवाडीचा आमदार हा तयारीचा असावा लागतो असे सांगत पाच वर्ष तयारी करा असे संजू परब यांना त्यांनी सांगितले. तर बाबु कुडतरकर यांना सोबत घेऊन काम करा, बबन साळगावकर उभे राहिले म्हणून तुम्ही नगराध्यक्ष झाला असंही ते म्हणाले.
दरम्यान, मागच्यावेळी बबन साळगावकर यांना उमेदवारी न देता अर्चना घारे-परब यांना दिली पाहिजे असं म्हंटले होते अन् घारेनीच माझ्या विरोधात काम सुरू केलं अशी टीपणी केली. घारे आपल्यासोबत आल्या तर त्यांच स्वागतच करेन असंही त्यांनी सांगितलं. तर प्रवीण भोसले यांना ते हॉस्पिटलमध्ये असताना निवडून आणलं होतं. ते काही गोष्टी विसरले. मी दोनवेळा त्यांना निवडून आणलं. सह्याद्री पट्ट्यात माझी ताकद आहे. भोसलेंना लोकांनीच पाडलं. राग त्यांनी माझ्यावर ठेवला. मी विकासकामं आणली. पण, ठेकेदार काम अडवून ठेवतात. ठेकेदारांची ही स्पेशल केस नारायण राणेंकडे देणार आहे. त्यांचा दरारा आहे त्यामुळे एका फोनवर काम होणार आहेत. निधी आणण्याच काम मी करेन, सिंधुदुर्गचा विकास करायला केसरकर आणि राणे एकत्रच पाहिजेत असंही त्यांनी सांगितलं. आता सगळे जोमाने काम करत आहात. विकासकामे करण्यासाठी आणि योजना तळागाळात नेण्यासाठी कामाला सुरुवात करा. आगामी जिल्हा परिषद, पंचायत समिती, नगरपरिषदांसाठी तयारी सुरू करा असेही आवाहन त्यांनी केले. लोकांची कामं करणं हे आपलं धेय्य आहे. येणाऱ्या निवडणूकांसाठी सर्वांनी जोमान कामाला लागा. दिवसरात्र तुम्ही काम केल्यान येणारा विजय तुमचा असेल असं विधान केसरकर यांनी केले.
यावेळी शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, भाजप जिल्हा संघटक महेश सारंग, बाळा गावडे, सुरज परब, बाबु कुडतरकर, विद्याधर परब, माजी उपनगराध्यक्ष प्रकाश बिद्रे आदी उपस्थित होते