
सावंतवाडी : मंत्री दीपक केसरकर यांनी केलेलं काम तुमच्यासमोर आहे. त्यामुळे २० तारखेला भरभरून मतदान करा. दीपक केसरकर यांना बहुमताने विजयी करायचे आहे. आपला विजय निश्चित आहे. राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली चांगल काम भविष्यातही करायचे आहे असे मत सौ. वृषाली श्रीकांत शिंदे यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथे त्या बोलत होत्या.
सौ. शिंदे म्हणाल्या, सावंतवाडीत आले खूप आनंद झाला. इथला परिसर, लोक मला फार भावली. त्यांनी केलेल आदरातिथ्य कायम स्मरणात राहील. मंत्री दीपक केसरकर यांचा विजय निश्चित आहे. त्यांच काम तुमच्यासमोर आहे. त्यामुळे विजयाचा चौकार मारताना मोठं मताधिक्य त्यांच्यामागे उभे करा असे आवाहन वृषाली शिंदे यांनी केले. सावंतवाडी शहरात त्यांनी दीपक केसरकर यांच्या प्रचारात सक्रिय सहभाग घेतला. मतदारांना महायुतीचे सरकार पुन्हा आणा असे आवाहन त्यांनी यावेळी केले.
याप्रसंगी शिवसेना नेत्या शितल म्हात्रे, माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर, सौ. सोनाली केसरकर-वगळ, महिला जिल्हाप्रमुख अँड निता सावंत कविटकर, माजी उपनगराध्यक्षा अन्नपुर्णा कोरगावकर, भारती मोरे आदींसह मोठ्या संख्येने पदाधिकारी कार्यकर्ते उपस्थित होते.










