केसरकरांना दोडामार्गातून मोठं मताधिक्य मिळेल : गणेशप्रसाद गवस

Edited by: लवू परब
Published on: November 17, 2024 20:10 PM
views 92  views

दोडामार्ग :  प्रचार संपण्यासाठी दोन दिवस असताना आमच्या महायुतीच्या कार्यकर्त्यांनी प्रचाराचा रान प्रत्येक गावागावात उठवल आहे. घर टू घर प्रचार आपल्या महायुतीच्या कार्यकर्त्यांकडून होत आहे. गावात गेल्यानंतर प्रत्येक गावातील लोक स्वागत करतात दीपक भाईंनी केलेल्या कामाचं कौतुक देखील करतात. दीपक भाईच्या माध्यमातून योजना असू दे वेगवेगळे कॉजवे वरील पुल असू दे अशा प्रत्येक कामाचं कौतुक करत लोक दिपक भाईंना प्रचंड बहुमतांनी निवडून देणार असे सांगतात अशाप्रकारे मिळणारा प्रतिसाद पाहता मला खात्री आहे. की दोडामार्ग तालुक्यातील प्रचंड मताधिक्य मिळवून आम्ही दीपक भाईंचा विजय प्राप्त करणारा आहोत, असा विश्वास कोकणसाद LIVEशी बातचीत करताना तालुका शिवसेना प्रमुख गणेशप्रसाद गवस म्हणाले.

ते पुढे म्हणाले आम्ही प्रत्येक गावात प्रचार सभा घेतल्या असता लोकांची बहुसंख्येने उपस्थिती पाहायला भेटली. महिला वर्गा कडून मोठ्या प्रमाणात स्वागत करण्यात आले. ठीक-ठिकाणी घेतलेल्या सभांमध्ये महिला वर्गांचा उत्स्फूर्त  प्रतिसाद मिळाला. महिला सांगतात लाडकी बहीण योजना मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांनी राबवलेली ह्या योजनेचा लाभ असाच पुढे सुरू राहण्यासाठी महायुतीचं सरकार येणं आवश्यक आहे. आणि त्यासाठी दीपकभाई निवडून विधानसभेत गेले पाहिजेत असा निर्धार त्या महिलांनी केला आहे. 

दीपक भाईंना घरी बसवणार अशी वल्गना करणाऱ्यांनी दोडामार्ग तालुक्यात स्वतःला किती मतदान होतं याचा विचार करावा सावंतवाडी आणि वेंगुर्ला तालुक्यात तर त्यांना कोणी विचारतच नाही आणि तीन-तीन वेळा निवडून येणाऱ्या भाईंवर अशी वल्गना करणे चुकीचा आहे. विकासात्मक प्रक्रियेमध्ये  दीपक भाईंनी ज्या प्रकारे काम केलं याचा स्तुत्य उपक्रम आज दोडामार्ग मध्ये दिसतोय मग पंचायत समितीची इमारत असो हेवाळे येथील पुल असो हॉस्पिटलची इमारत असो नगरपंचायत ची इमारत, नगरपंचायत मच्छी मार्केट, सार्वजानिक बांधकाम इमारत, दोडामार्ग मधील नाट्यगृह, अशा प्रकारे मोठ्या प्रमाणात निधी दीपकभाईंनी दोडामार्ग तालुक्यासाठी दिलेला आहे. त्यामुळे उद्याच्या वीस तरीखला याची प्रचिती नक्की येणार आहे.


विरोधकांना प्रचार करण्यासाठी माणसंच भेटत नाहीत : गणेशप्रसाद गवस

दोडामार्ग तालुक्यात विरोधकांचा प्रचारच कुठे दिसत नाही. विरोधकांच्या प्रचारसभा देखील कुठे झालेल्या नाहीत. आणि विरोधकांना प्रचार करण्यासाठी माणसेच भेटत नाही अशी विरोधकांची परिस्थिती आहे. दोडामार्ग तालुक्यातील जनता बाहेरून आलेला उमेदवाराला येथे स्थान देणार नाही. त्यामुळे लोक देखील त्यांना प्रतिसाद देत नसून इतर जे उमेदवार आहेत. एक उमेदवार कणकवली तर दुसरे उमेदवार माणगाव खोरे तर तिसरे उमेदवार पुणे असे बाहेरील उमेदवार आहेत. आणि येथील स्थानिक उमेदवार हे फक्त दीपक भाई केसरकर आहेत. त्यामुळे लोकांचा उत्पूर्त प्रतिसाद आणि पाठिंबा दीपक भाईंसोबत आहे. म्हणून विरोधकांना प्रचारासाठी माणसं मिळत नसल्याचे चित्र दिसत आहे. असे गणेश प्रसाद गवस प्रसार माध्यमांशी बोलताना म्हणाले.