माजगावातील महादेव मंदिरात श्रीफळ ठेवून केसरकरांचा प्रचार

Edited by: विनायक गांवस
Published on: November 12, 2024 13:50 PM
views 139  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचाराचा शुभारंभ माजगाव येथील श्री महादेव मंदिरात श्रीफळ ठेवून करण्यात आला. यावेळी आर के सावंत, सुरेश सावंत, सुरेंद्र गावडे, अजय सावंत, शिवसेना जिल्हा प्रमुख अशोक दळवी, जिल्हा संघटक संजू परब,उपसरपंच संतोष वेजरे, सदस्य मधु कुंभार, माधवी भोगण, माजी सरपंच सुनीता जाधव, संदीप सावंत, खेमा हरमलकर, आबा सावंत, माजी सदस्य वंदना सावंत,, तसेच सचिन बिर्जे शाम कासार, रामदास भोगण, रूपेश नाटेकर, संजय माजगावकर, सदा गावडे आदी कार्यकते व महिला उपस्थित होते. 

शुभारंभानंतर दीपक केसरकर यांना भरघोस मतांनी निवडून येण्यासाठी घरोघरी प्रचाराची सुरवात करण्यात आली. माजगाव येथील प्रचारात गावातील ग्रामस्थांनी पुढाकार घेतला आहे.