दीपक केसरकरांचा जोरदार प्रचार

Edited by: विनायक गांवस
Published on: November 09, 2024 19:22 PM
views 323  views

सावंतवाडी : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांच्या प्रचारार्थ पदाधिकारी, कार्यकर्त्यांनी जोरदार प्रचाराला सुरुवात केली आहे. केसरकर यांना विजयी करण्यासाठी मतदारांना आवाहन यावेळी करण्यात आले. केसरकर मोठ्या मताधिक्याने विजयी होतील असा विश्वास यावेळी उपस्थितांनी व्यक्त केला.


सावंतवाडी शहरातील उभाबाजार, वैश्यवाडा, चिताराळी परिसरात महायुतीच्या पदाधिकाऱ्यांनी प्रचार यंत्रणा राबविली. दीपक केसरकर यांना विजयी करण्यासाठीचे आवाहन मतदारांना करण्यात आले. यावेळी माजी नगरसेवक मनोज नाईक, आनंद नेवगी, शुभांगी सुकी, राघवेंद्र चितारी, राजन नाईक, मेघना साळगावकर, सौ. धारगळकर, सौ. सुकी आदींसह भाजप, शिवसेना, राष्ट्रवादी, रिपाईचे पदाधिकारी, कार्यकर्ते  उपस्थित होते.