अक्कलकोटमधून स्वामी समर्थांच्या पादुकांचे केसरकरांच्या घरी आगमन

Edited by: विनायक गांवस
Published on: November 09, 2024 14:04 PM
views 202  views

सावंतवाडी : अक्कलकोट येथील श्री स्वामी समर्थ यांच्या पादुका आज सावंतवाडी शहरात आल्या असून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी या पादुकांचे आपल्या निवासस्थानी स्वागत केले. स्वामींच्या पादुकांचे विधीवत पूजन दीपक केसरकर यांनी सपत्नीक केले. यावेळी निवडणूकीत घवघवीत यश मिळावे असे साकडे देखील घालण्यात आले. यावेळी महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर, माजी नगराध्यक्षा सौ. पल्लवी केसरकर आदी उपस्थित होते.