
दोडामार्ग : महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांना दोडामार्ग शहरात 80% हुन अधिक मताधिक्य मिळणार असून त्यांचा एकदीलाने प्रचार करणार असून विजय महायुतीचाच होणार असा ठाम विश्वास नगरसेवक संतोष नानचे यांनी व्यक्त केला.
दोडामार्ग शहरात महायुतीची बैठक पार पडली यावेळी ते बोलत होते. ते पुढे म्हणाले की विरोधकांनी कितीही अपप्रचार केला तरी जनता त्यांना बळी पडणार नाही. दोडामार्ग शहरता 80 टक्के हुन अधिक मताधिक्य हे दीपक केसरकर यांना मिळाणार आहे. त्यासाठी महायुतीचे पदाधुकारी व कार्यकर्ते एकमताने जोमाने कामाला लागले आहे. घरटूघर असा प्राचार करून जास्तीत जास्त मते महायुतीच्या उमेदवार दीपक भाई यांना मिळवण्यासाठी आमचे पदाधिकारी पर्यंत करीत आहेत त्यामुळे विजय महायुतीचाच आहे असा विश्वास नानचे यांनी व्यक्त केला.
यावेळी त्यांच्या सोबत शिवसेना तालुका प्रमुख गणेश प्रसाद गवस, भाजप जिल्हा सरचिटणीस महेश सारंग, भाजप तालुका प्रमामुख सुधीर दळवी, नगराध्यक्ष चेतन चव्हाण, उपनगराध्यक्ष देविदास गवस, नगरसेवक नितीन मणेरीकर, रामचंद्र मणेरीकर, राजेश प्रसादी, रामचंद्र ठाकूर, राजेंद्र निंबाळकर, योगेश महाले, राजेश फुलारी, गोपाळ गवस, पांडुरंग बोर्डेकर, सुधीर पनवेलकर शाखा प्रमुख, बूथ प्रमुख, शिवसैनिक भाजप कार्यकर्ते आदी मोठ्या संखेने उपस्तीत होते.