
प्रचाराला येणार देवेंद्र फडणवीस : दीपक केसरकर
सावंतवाडी : रॉंग नरेटीव्ह सेट करून आपली पोळी भाजून घेण्याची नवी पद्धत राजकारणात रूढ होऊ पाहत आहे. ज्यांनी आयुष्यात काही केल नाही ते माझा निष्क्रिय आमदार म्हणून उल्लेख करतात. पंधरा वर्षात मी हजारो कोटीची काम केली. पण, मागच्या पाच वर्षात तब्बल २ हजार ५४२ कोटीची काम मी केलीत. ज्या उद्यानातून माझ्यावर टीका करत आहेत ते उद्यान मी बांधलं. त्याला जनरल जगन्नाथराव भोसले उद्यान असं नाव दिलं. सावंतवाडीचा इतिहास जपण्याच काम केलं. सावंतवाडी संस्थानात कोणाताही वाईट विचार आजवर रूजलेला नाही अस मत महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. सावंतवाडी येथील आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
ते म्हणाले, मागच्या पंधरा वर्षात सावंतवाडी, दोडामार्ग व वेंगुर्ला तालुक्यात मोठ्या प्रमाणात विकासकामे केली. तिन्ही शहरांचा कायापालट केला. तेव्हाचा मतदारसंघ व आताचा मतदारसंघ यात मोठा फरक आहे. रॉंग नरेटीव्ह सेट करून आपली पोळी भाजून घेण्याचा प्रयत्न सुरू आहे. मी केलेल्या कामाची कधी प्रसिद्धी करत बसलो नाही. ज्यांनी आयुष्यात काहीही केल नाही ते माझ्यावर बोलत आहेत. मागच्या पाच वर्षात तब्बल २हजार ५४२ शे कोटीची काम मी केलीत. येणाऱ्या काळात पर्यटन व्यवसाय वाढण्यासाठी माझा पुढाकार आहे. फुलपाखरांच गाव, कवितांच गाव आम्ही केलं. माझ्या मतदारसंघात दोन फाईव्हस्टार हॉटेल आहेत. सकारात्मक विचार घेऊन आम्ही काम करत आहोत. खासदार नारायण राणे व पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची साथ व मार्गदर्शन मला आहे.
तसेच मल्टिस्पेशालिटीचा कॅबिनेट ठराव झाला आहे. जागेची अडचण दूर होईल. मतदारसंघातील एकही काम शिल्लक राहणार नाही. कोकणसाठी कॅबिनेटमध्ये भांडणारा मी मंत्री आहे. अनेक योजना जिल्ह्यासाठी मंजूर करून आणल्या आहेत. जर्मनीत आपल्या मुलांना नोकरीसाठी करार केला. सिंधुदुर्गची पहिली बॅच यासाठी गेली. दुरदृष्टीन काम मी केलं. एवढं काम केल्यानंतर बिनविरोध निवडून दिलं पाहिजे होत. मात्र, इकडे केवळ विरोधाला विरोध होत आहे. स्वतःचा स्वार्थ यामागे आहे. जमिनीच्या वाढत्या किंमती, शेजारील गोवा राज्य हा स्वार्थ आहे. या पलिकडे विरोधी उमेदवारांच दुसरं काही नाही आहे. शेतकऱ्यांचा अश्रूंन भिजलेले पैसै लोक स्वीकारणार नाही. सावंतवाडीची जनता विकली जाणारी नाही. अशा लोकांना गावात यायला देऊ नये. कंपन्याना जमीनी विकायच्या असतील तर कमिशन घ्या, शेतकऱ्यांना पूर्ण मोबदला द्या. मात्र, शेतकऱ्यांना लुबाडू नका. ते मी होऊ देणार नाही असं मत श्री. केसरकर यांनी व्यक्त केले.
दरम्यान, सावंतवाडीच्या जेलमध्ये काहीना बघितल्यावर आश्चर्य वाटलं. त्यांना मी का जेलमध्ये टाकेन. त्या प्रकरणात शिक्षा झाल्या नाहीत म्हणून ही लोकं सवकलीत. तिलारीत बाउंसर कोणी आणले ? ते लोकांना माहित आहे. अशा अनिष्ट प्रवृत्तीला सावंतवाडीत थारा देऊ नका. बापुसाहेब महाराजांची, शिवराम राजेंची ही सावंतवाडी आहे. इथे अपप्रवृत्तीला थारा देऊ नका असं आवाहन केलं. तर दोनदा नाकारून कणकवलीला लोकांनी पाठवल असताना त्यांनी आता सावंतवाडीत घर बांधल. मुलांचं नावही मतदारसंघात घालून घेतल अशी टीका केली.
तसेच ब्राऊन शुगर सारखं वाईट काही नाही. हा राक्षस कोण ?याची चौकशी पोलिसांनी करावी. नारायण राणे यांच्यासारखे जबाबदार खासदार यावर बोलतात त्यावेळी पोलिसांकडून तातडीनं कारवाई झाली पाहिजे. राणेंच्या प्रश्नाच उत्तर पोलिसांना द्याव लागेल असं श्री. केसरकर यांनी सांगितले. तर मला बाउंसर लागत नाही. मी एकटा फिरतो, माझ्या लोकांना भेटतो असंही ते म्हणाले
आम्ही देवाला मानणारी आम्ही लोक आहोत. त्यामुळे नारळ ठेऊन प्रचाराला सुरू करणार आहे. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे येऊन गेले आहेत. निलेश राणेंच्या मतदारसंघात आले म्हणजे माझ्यासाठीच आले. उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी प्रचाराला स्वतः येणार असल्याचे सांगितले आहे. खोटं बोलणाऱ्या लोकांची उत्तर तेच देणार आहेत. आमची शिवसेना आहे. बाळासाहेबांचे विचार व चिन्ह आमच्यासोबत आहे असं मत दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.