दीपक केसरकरांची संपत्ती किती ?

किती सोनं, किती कर्ज ?
Edited by: विनायक गांवस
Published on: October 29, 2024 14:52 PM
views 965  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातील महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांची जंगम मालमत्ता ४ कोटी ६३ लाख ३१ हजार ७५६ रू. एवढी आहे‌. तर स्थावर मालमत्ता १२१ कोटी ७९ लाख ३८ हजार ९८० हजार इतकी असल्याचे उमेदवारी दाखल करतानाच्या विवरणपत्रात नमुद केले आहे.

सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी आपल्या अर्जात स्थावर व जंगम मालमत्तेचे विवरण दाखविले आहे. यानुसार विशाल त्यांची जंगम मालमत्ता ४,६३,३१,७५६  असून पत्नीची १,३५,०६,७३०  एवढी आहे. स्थावर मालमत्ता १२१,७९,३८,९८० एवढी आहे. दीपक केसरकर यांच्याकडे १ लाख ४० हजार ५५६ व पत्नीकडे ४० हजार ५०० रोख रक्कम हाती आहे. प्रलंबित असणाऱ्या फौजदारी खटल्यांची एकूण संख्या निरंक आहे. २९,२२,२१,९५५ एवढे त्यांचे व   पत्नीचे दायित्व ४,९९,११३ आहे. ३ वाहने केसरकर यांच्याकडे असून ती १४,५०,५४१ रू.ची वाहन आहेत. पत्नीकडे असणाऱ्या जडजवाहीर, सोनेचांदी मौल्यवान वस्तु या ८९,३५,७५० रूपयांच्या आहेत तर १२,८३,२४५ रूपयांच्या दीपक केसरकर यांच्याकडे आहेत.