मंत्री केसरकर चौथांदा निवडणुकीच्या रिंगणात

भरला उमेदवारी अर्ज
Edited by: विनायक गांवस
Published on: October 29, 2024 13:15 PM
views 250  views

सावंतवाडी : सावंतवाडी विधानसभा मतदारसंघातून महायुतीचे उमेदवार शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी जोरदार शक्तिप्रदर्शन करत उमेदवारी अर्ज दाखल केला. शिवसेनेकडून भव्य मिरवणूक काढत श्री. केसरकर यांचा उमेदवारी अर्ज दाखल केला. यावेळी दीपक केसरकर चौथ्यांदा विक्रमी मतांनी विजयी होतील असा विश्वास खासदार नारायण राणेंनी व्यक्त केला. 

सावंतवाडी मिलाग्रीस हायस्कूल येथून शिवसेनेच्या रॅलीला सुरुवात झाली. गांधी चौक येथे महायुतीच्या नेत्यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले. यानंतर प्रांताधिकारी कार्यालयात जात दीपक केसरकर यांनी आपला उमेदवारी अर्ज दाखल केला. नारायण राणे, दीपक केसरकर यांच्यासह उपस्थितांनी यावेळी विजयाचा विश्वास व्यक्त केला. याप्रसंगी खासदार नारायण राणे, महायुतीचे उमेदवार मंत्री दीपक दीपक केसरकर, सौभाग्यवती पल्लवी केसरकर, आमदार नितेश राणे, माजी खासदार निलेश राणे, युवराज लखमराजे सावंत -भोसले, भाजप जिल्हाध्यक्ष प्रभाकर सावंत, शिवसेना जिल्हा संघटक संजू परब, शिवसेना जिल्हाप्रमुख अशोक दळवी, जिल्हा बँक अध्यक्ष मनीष दळवी, भाजपच्या महिला जिल्हाध्यक्षा श्वेता कोरगावकर, शिवसेना जिल्हाप्रमुख अँड. नीता कविटकर, केसरकर यांच्या कन्या सोनाली व जावई सिद्धार्थ वगळ आदींसह शेकडो शिवसैनिक उपस्थित होते.