
सावंतवाडी : मी इथून हॅट्ट्रिक केली आहे. आता चौथ्यांदा देखील विजयी होईन. नारायण राणे माझ्या सोबत आहेत. कोकणचा विकास करण्यासाठी आता निलेश व नितेश राणेंची सोबत मला लाभत आहे. देशाला कौतुक वाटेल असं काम या पर्यटन जिल्ह्यात आम्ही करू असा विश्वास महायुतीचे उमेदवार दीपक केसरकर यांनी व्यक्त केला.
लखमराजे भोंसले यांच्यासह राजघराण्याचे आशीर्वाद आम्हाला आहे. पालकमंत्री रविंद्र चव्हाण यांची साथ आम्हाला आहे. अनेक योजना आमच्या सरकारने देशात व राज्यात राबविल्या आहेत. येणार सरकार देखील महायुतीचे असेल असा विश्वास श्री. केसरकर यांनी व्यक्त केला. बापुसाहेब महाराजांच्या शताब्दी वर्ष आहे. राजघराण्याचा आशीर्वाद आम्हाला आहे. तसेच विशाल परब यांनी आपला अर्ज मागे घ्यावा. भाजप नेत्यांची नावं वापरण्याचा अधिकार त्यांना नाही. त्यांनी उमेदवारी मागे घेतली तर पक्ष विचार करेल अन्यथा जिल्हाध्यक्ष योग्य तो निर्णय घेतील अशी प्रतिक्रिया शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.