
दोडामार्ग : वायगंणतड येथे दोन दिवसांपूर्वी अपघातात मयत झालेल्या दोडामार्ग तालुक्यातील घोटगेवाडीतील संतोष शेटकर व तिलारीतील आनमारी मेंगेल सोझ यांच्या कुटुंबाला मंत्री दीपक केसरकर यांनी प्राथमिक स्वरूपाची आर्थिक मदत केली आहे. राजन पोकळे यांच्या हस्ते आज या आपतग्रस्त कुटुंबाला ही मदत घरपोहोच करण्यात आली असून त्या कुटुंबियांनाही मंत्री केसरकर यांच्या वतीने शिवसेना पदाधिकारी यांनी धीर दिला आहे.
यावेळी शिवसेनेचे तालुक्यातील पदाधिकारी व ग्रामस्थ उपस्थित होते. शेटकर यांच्या कुटुंबाला तातडीची रोख रुपयांची मदत त्यांच्या मुला कडे सुपुर्द केली. यावेळी यावेळी उपज़िल्हाप्रमुख राजेंद्र निंबाळकर, विधानसभा मतदार संघप्रमुख प्रेमानंद देसाई, गोपाळ गवस तालुका संघटक, भगवान गवस, युवा अध्यक्ष, विनायक शेट्ये उप विभाग प्रमुख, रत्नकांत कर्पे उपसरपंच, ज्ञानेश्वर शेट्ये, कांता गोवेकर, मायकल लोबो उपतालुका प्रमुख, च्चर कमिटी मिलिंन फर्नांडीस, मार्शल फर्नांडीस, सकृ लोबो, ब्रिन डायस, सुनील शेट्ये, राघोबा शेटकर, माजी सरपंच प्रेमनाथ कदम, राजू देसाई, सुभाष शेटकर, बाबली दळवी, बाळकुष्ण मणेरीकर, संदीप तुळसकर आदी ग्रामस्थ उपस्थित होते.