
सावंतवाडी : आंबोली चौकुळ, गेळे येथील कबुलायतदार गांवकर जमीन वाटप वन संज्ञा नोंद असलेल्या जमीन वाटपाचा प्रश्न अडचणीचा ठरला होता. याबाबत वन सेक्शन ६ अंतर्गत चौकशी पूर्ण झाली आहे. आता हा प्रस्ताव महसूल खात्याकडे गेला असून महसूल मंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांच्याशी चर्चा केली आहे. वनखात्याचा ३५ सेक्शन नोंद हविण्यासाठी महसूल मंत्री निर्णय घेतील. आंबोली आणि गेळेचा जमीन वाटपाचा जीआर झालेला आहे. आता चौकुळचा जीआर काढला जाईल. तो लवकरच निघेल अशी माहिती शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी दिली.
आंबोली, चौकुळ व गेळे येथील कबुलायतदार गावकर जमीन वाटप, पायाभूत सुविधांची निर्मिती आरक्षण, रस्ते अशा कारवाई पूर्ण होतील. गेळे जमिनी बाबत फॉरेस्ट झोन लागला आहे तो नगरविकास खात्याकडे हटविला जाईल. चौकूळ येथे आज बैठक झाली आचारसंहितेपूर्वी जीआर काढण्याबाबत त्यांनी मागणी केली आहे. त्यांची मागणी लवकरात पूर्ण होईल असे मंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. चौकुळ, आंबोली आणि गेळे येथील वन जमिनीची सेक्शन ६ अंतर्गत चौकशी पूर्ण झाली आहे. त्यामुळे लवकरच महसूलमंत्री राधाकृष्ण विखे पाटील यांवर निर्णय घेतील असं शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी सांगितले. यावेळी शिवसेना शहरप्रमुख खेमराज उर्फ बाबू कुडतरकर उपस्थित होते.