जिल्हाधिकारी यांनी स्वतःहून बदली मागितली

मीच पत्र दिलं होतं : मंत्री दीपक केसरकर
Edited by: विनायक गांवस
Published on: September 05, 2024 09:00 AM
views 427  views

सावंतवाडी : जिल्हाधिकारी किशोर तावडे यांनी स्वतः हून बदली मागितली. त्यांनी आरोग्याच्या दृष्टीने हा निर्णय घेतला आहे‌. एक वर्षापूर्वी त्यांना हदय विकाराचा धक्का आला होता. ही दगदग, धावपळ बघता त्यांनी एक महिना आधी हा निर्णय घेतला. त्यांच्या या कारणामुळे आपण हस्तक्षेप केला नाही. अन्यथा त्यांना मी सोडलच नसतं. वैद्यकीय कारणांमुळे त्यांनी मागून घेतलेली ही बदली आहे. त्यांची बदली कुणी करू शकत नाही. माझ्या जिल्ह्यातील बदली मुख्यमंत्री मला विचारल्याशिवाय करणार का ? मीच पत्र दिलं होतं की त्यांच्या मागणीनुसार बदली करावी असं मत शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले. 


ते म्हणाले,  तळमळूण काम करणाऱ्या अधिकाऱ्याच्या शेवट बघणार का ? ते शक्य नसतं. ते जिल्हाधिकारी नसते तर वन  जमीनीचा प्रश्न सोडवू शकलो नसतो. सिंधुदुर्ग जिल्ह्याच्या कोरपान कोपरा त्यांना माहित आहे. अनेक गावांत त्यांनी मुक्काम केल आहे. असा अधिकारी जिल्ह्यातून जाण हा सेटबॅक आहे. त्यांनी स्वतःहून बदली मागितली. एक महिन्यापूर्वी मी मागणी केली होती. छत्रपतींच्या पुतळ्याची चौकशी होई पर्यंत त्यांनी चार्ज सोढला नाही. त्यांनी आपल काम १०० टक्के पूर्ण केलं आहे‌.


दरम्यान, जाहिरपणे कुणी एखाद्याचा पाणउतारा करत असेल तर त्या अधिकाऱ्याने ते का सहन कराव ? तो अधिकारी सुद्धा एक मनुष्य आहे. त्यांची हेल्थ चांगली नाही असं माहित असताना सुद्धा कुणी असं करत असेल तर बरोबर केल की चुक याचा विचार त्या व्यक्तीने केला पाहिजे. माझ्या दृष्टीने समोरच्या व्यक्तीला आरोग्य दृष्ट्या त्रास होऊ नये म्हणून मी माझं कर्तव्य केलं. पुतळा पडल्यानंतरची ही बदली नाही. त्या आधी एक महिना बदलीची मागणी जिल्हाधिकारी यांनी केली होती. शासनान त्याचा विचार करून त्यांची मागणी मान्य केली. तर छत्रपतींचा पुतळा पडल्यानंतर सार्वजनिक बांधकामच्या अधिकाऱ्यांची बदली का झाली नाही ? हा प्रश्न मला न विचारता संबंधित मंत्र्यांना विचारावा लागेल. आपले पालकमंत्री हेच सार्वजनिक बांधकाम विभागाचे मंत्री आहेत. ते याबाबत आपल्या खात्याला विचारू शकतात. मी ते विचारू शकत नाही. त्यांच्या अभियंत्यांना मी विचारू शकतो का ? आमच्या दोघांत वाद लावून देण्यासारखा हा प्रकार आहे असं मत मंत्री दीपक केसरकर यांनी व्यक्त केले.