
वेंगुर्ले : शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवस म्हापण जिल्हा परिषद मतदारसंघ शिवसेना व कोचरा सरपंच योगेश तेली यांच्या संयुक्त विद्यमाने विविध सामाजिक, शैक्षणिक उपक्रमांनी साजरा करण्यात आला. यावेळी म्हापण जिल्हा परिषद मतदार संघातील शालेय गुणवंत विद्यार्थ्यांचा सत्कार, माध्यमिक शालांत परीक्षेत प्रथम आलेल्या अर्पिता सामंत तिचा विशेष सन्मान व विविध क्षेत्रातील मान्यवरांचा सन्मान करण्यात आले.
१८ जुलै रोजी म्हापण जिल्हा परिषद मतदार संघात शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त माध्यमिक शालांत परीक्षेत राज्यात प्रथम आलेल्या अर्पिता अमेय सामंत हिचा लॅपटॉप व सन्मानचिन्ह देऊन विशेष सन्मान करण्यात आला. तसेच
अण्णासाहेब देसाई विद्या मंदिर परुळे, स.का. पाटील विद्यामंदिर केळूस, एस. एल. देसाई विद्यालय व कै. सौ. आर एस पाटील कनिष्ठ महाविद्यालय पाठ या शाळांतील प्रथम तीन क्रमांक प्राप्त विद्यार्थ्यांचा सन्मान करण्यात आला. पाठ हायस्कूल मधील शिष्यवृत्ती प्राप्त १५ विद्यार्थ्यांचा व कोचरे गावचा सुपुत्र, कुडाळ हायस्कूलमध्ये प्रथम आलेल्या पारस कुबल याचाही सत्कार यावेळी करण्यात आला. त्याचप्रमाणे पाट हायस्कूलचे नवनियुक्त मुख्याध्यापक राजन हंजणकर व प्रशालेच्या कर्मचारी शैलेश तेली यांचाही सत्कार करण्यात आला.
यावेळी भोगवे माजी सरपंच महेश सामंत, शिवसेना उपजिल्हाप्रमुख सचिन देसाई, कोचरा सरपंच योगेश तेली, म्हापण विभाग प्रमुख देवदत्त साळगावकर, माजी जिल्हा परिषद सदस्य अविनाश देसाई, कोचरा उपसरपंच गुरुनाथ शिरोडकर, माजी नायब तहसीलदार सुभाष चौधरी, माजी सरपंच विष्णू फणसेकर, सुनील करलकर, कोचरा तंटामुक्ती अध्यक्ष ब्रिजेश तायशेटे, ग्रा.प.सदस्य अविनाश खोत, विशाल वेंगुर्लेकर, संजय गोसावी, अनिल सुतार, पूजा नांदोस्कर, सौ. परब, प्रगती राऊत यांच्या सहित विद्यार्थी, पालक, शिक्षक व ग्रामस्थ तसेच आरोग्य विभाग कर्मचारी उपस्थित होते. मान्यवरांचे स्वागत यज्ञा गोसावी- साळगावकर यांनी तर कार्यक्रमाचे प्रास्ताविक गुरुनाथ केरकर व आभार प्रदर्शन आबा कोचरेकर यांनी केले. यानंतर सर्व मान्यवरांच्या उपस्थितीत शालेय शिक्षण मंत्री दीपक केसरकर यांच्या वाढदिवसानिमित्त केक कापून अभिष्टचिंतन करण्यात आले.