केसरकरांना हद्दपार करा !

रुपेश राऊळांचा घणाघात
Edited by:
Published on: August 18, 2024 09:05 AM
views 226  views

सावंतवाडी : तब्बल 15 वर्ष संधी दिल्यानंतरही सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील जनतेला विकासापासून कोसोदूर ठेवणाऱ्या केवळ घोषणा करून जनतेच्या भावनांशी खेळणाऱ्या केसरकरांना आगामी काळात विधानसभा निवडणुकीतून हद्दपार करा असा घणाघात उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेचे सावंतवाडी विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी केला. सोनुर्ली येथे आयोजित कार्यक्रमात ते बोलत होते.

सोनुर्ली येथे शिवसेना सावंतवाडी विधानसभा संपर्क यात्रा पोहोचली. यावेळी आयोजित कार्यक्रमात विधानसभा प्रमुख रुपेश राऊळ यांनी मंत्री केसरकरांवर सडकून टीका केली. ते म्हणाले, सावंतवाडी विधानसभा क्षेत्रातील तब्बल 15 वर्षे आमदार असलेले व त्यातील साडेसात वर्ष मंत्रीपद उपभोगलेले केसरकर यांनी फक्त स्वतःचा स्वार्थ साधला आहे. येथील जनतेला विकासापासून वंचित ठेवून त्यांनी जनतेच्या भावनांना तिलांजली दिली आहे. आगामी विधानसभा निवडणुकीत महाविकास आघाडीला जनतेने निवडून द्यावे व खऱ्या अर्थाने महाराष्ट्राच्या विकासाचा विचार करणाऱ्या उद्धव बाळासाहेब ठाकरे शिवसेनेला आणि महाविकास आघाडीला साथ द्यावी असे राऊळ यांनी सांगितले.

दरम्यान, यावेळी उपस्थित मान्यवरांच्या हस्ते वृक्ष वाटप कार्यक्रम संपन्न झाला. यावेळी जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी जिल्हा समन्वयक बाळा गावडे यांनीही आपल्या मनोगतातून मंत्री केसरकरांवर जोरदार प्रहार केला व उपस्थितांना महाविकास आघाडीलाच साथ द्यावी, असे आवाहन केले.

यावेळी व्यासपीठावर जिल्हाप्रमुख बाबुराव धुरी, उपजिल्हाप्रमुख चंद्रकांत कासार, जिल्हा जिल्हा समन्वयक बाळा गावडे,  तालुका संघटक व माजी जिल्हा परिषद सदस्य मायकेल डिसोजा, काँग्रेसचे पदाधिकारी रवींद्र म्हापसेकर, भारती कासार, श्रीमती कासार, उपविभाग प्रमुख विनोद ठाकूर, बाळू परब, संजय गवस, कौस्तुभ गावडे, शब्बीर मणियार, अशोक दत्ताराम परब (शिवदूत), शाखाप्रमुख नरेश मोरे, युवा सेना विभाग प्रमुख संदेश मडुरकर, अनिल गावकर, नामदेव गावकर, अनिता गावकर, आर्वी गोसावी, बाबी धडाम, सोमा धडाम, सरस्वती धुरी, रुक्मिणी राऊळ, निलेश मोर्ये, संकेत गावकर, बापू मोर्ये, मारुती म्हापसेकर, सुरेश गावकर,तिळबा जाधव, उत्तम नाईक, धोंडीबा गावकर, महादेव गावकर, मनोहर गावकर, माई मौर्ये, रामचंद्र गावकर, वैभवी गावकर आदी उपस्थित होते.