दोडामार्गातील शाळा दुरुस्तीसाठी मंत्री केसरकरांकडून निधी !

Edited by: संदीप देसाई
Published on: August 18, 2024 08:56 AM
views 148  views

दोडामार्ग : शिक्षा अभियानांतर्गत राज्य शासन शिक्षण विभाग यांच्या माध्यमातून दोडामार्ग तालुक्यातील नविन शाळा वर्ग खोली बांधकाम वर्ग खोली दुरूस्ती साठी शालेय शिक्षण मंत्री यांच्या माध्यमातून एक कोटी पाच लाख रूपये मंजूर करण्यात आले आहेत. त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील नादुरुस्त शाळा आता चकाचक होणार आहेत असे तालुका प्रमुख गणेशप्रसाद गवस यांनी सांगितले आहे.

    तसेच तालुक्यातील नविन वर्ग खोली बांधकाम हेवाळे 1 खोक्रल 2 कुडासे 1 साटेली भेडशी 1 व शाळा दुरुस्ती मांगेली फणसवाडी व देऊळवाडी वझरे कुभंवडे कोलझर अशा अनेक शाळाची दुरूस्ती जिल्हा नियोजन मधुन नीधी जी प शिक्षण विभाग सिंधुदुर्ग यांना दिला आहे त्यामुळे आता दोडामार्ग तालुक्यातील नादुरुस्त शाळा आता नव्याने सुस्थितीत होणार आहेत.

    तसेच नुकत्याच झालेल्या शिक्षक भरती दोडामार्ग तालुक्यातील सर्व रिक्त पदे भरण्यात आली आहेत व दहा पटसंख्या पेक्षा कमी मुल असणारे शाळेत स्थानिक डिएड शिक्षक भरण्यात येणार आहेत त्यामुळे दोडामार्ग तालुक्यातील रिक्त शिक्षक पदाचा प्रश्न निकालात येणार आहे याबद्दल मा दिपक केसरकर यांचे तालुक्यातील ग्रामस्थ यांनी आभार मानले आहेत.